विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी लोटला जनसागर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय संघासाठी 4 जुलै हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला. दिल्लीच्या विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत संपूर्ण देश हा टीम इंडियामय झाला होता. ढोल ताशाच्या गजरात सेलिब्रेशन करताना ना टीमचा ना चाहत्यांचा उत्साह कमी झाला. त्यात वरूण राजाची उपस्थिती चार चांद लावून गेली. 

यावेळी एक घटना अनेक काही गोष्टी सांगून गेली. ज्यावेळी टीम इंडिया भारतात आली त्यावेळी ट्रॉफी रोहितकडं होती. मात्र टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये पोहचेपर्यंत हीच ट्रॉफी भावी कर्णधार रोहित शर्माकडं आली.

अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

त्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली. हवामान खराब असल्यानं टीम इंडिया मुंबईत उशीराने दाखल झाली. विमान तळावरून टीम इंडिया बसमधून रवाना झाली. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची प्रचंड गर्दी आहे. अनेक चाहते रोहित शर्मासाठी तुफान पावसात देखील रस्त्यावर उतरले आहे.

अखेर उशीरा का होईना टीम इंडिया मिरवणुकीच्या बसवर सवार झाली. मात्र चाहत्यांच्या प्रचंड जनसागराच्या उपस्थितीमुळे टीम बसची गती फारच कमी होती. टीमचा उत्साह मात्र प्रचंड होता. संघातील खेळाडू वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावत, हातवारे करत चाहत्यांचे अभिवादन स्विकारत होते.

ढोल ताशाच्या तालावर टीम इंडियातील खेळाडू ओपन बसमध्येच नृत्य करू लागले होते. याच मोठ्या उत्साहात टीम इंडिया वानखेडेवर पोहचली.
 
रोहित शर्माने चाहत्यांचे मानले आभार 
 
 
रोहित शर्मा वानखेडेवर म्हणाला की, आम्ही भारतात आल्यापासून जे आमचं स्वागत झालं आहे ते पाहून आमच्यापेक्षा देशातील जनतेलाचीच ट्रॉफी जिंकण्याची किती तीव्र इच्छा होती हे दिसून येतं.