जिद्दी भारतीयांनी बांगलादेशचा केला सुपडा साफ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
 बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवणारा भारतीय संघ विजेतेपदाच्या करंडकासह.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवणारा भारतीय संघ विजेतेपदाच्या करंडकासह.

 

पूर्ण दोन दिवसांसह २०० हून अधिक षटकांचा खेळ वाया जाऊनही भारतीय संघाने अशक्य ते शक्य असा दिमाखदार खेळ करून बांगलादेशचा दुसऱ्या कसोटी सामन्यात सात विकेटने पराभव केला. गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे मायदेशात सलग १८वी कसोटी मालिका जिंकण्याचाही पराक्रम रोहित शर्माच्या भारतीय संघाने केला.

कसोटी सामन्यात साधारणतः प्रत्येक दिवशी ९० षटकांचा खेळ अपेक्षित असतो; परंतु खेळापेक्षा अधिक वेळ पाऊस आणि निसरडे मैदान यामुळे वाया गेलेल्या या सामन्यात केवळ १७३.२ षटकांचा खेळ झाला, तरीही जिगरबाद भारतीय संघाने सामना निकालो ठरवला. आजच्या अखेरच्या दिवशी तर एका सत्राहून अधिक काळ शिल्लक असतानाच भारतीयांना विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशचा दुसरा डाव ४७ षटकांत अवघ्या १४६ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीयांनी विजयाचे ९५ धावांचे आव्हान १७.२ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. यशस्वी जयस्वाल सामन्यात तर आर. अश्विन मालिकेत सर्वोत्तम ठरला. 

अश्विन-जडेजा आणि बुमरा या तिघांनी बांगलादेश फलंदाजांचे दुसऱ्या डावात कंबरडे मोडले. त्याअगोदर काल ८.२२च्या सरासरीने भारतीयांनी २८५ धावा करून विजयाचा पाया रचला होता. ५२ धावांच्या आघाडीसमोर काल दिवसअखेर बांगलादेशची दोन बाद २६ अशी अवस्था करून भारतीयांनी विजयाकडे कूच केली होती. आज अखेरच्या दिवशीही हवामान निरभ्र असणार हे निश्चित होते, एकूण ९८ षटकांचा खेळ नियोजित होता, त्यामुळे बांगलादेशचे उर्वरित फलंदाज किती तग धरतात, यावर भारताचा विजय लांबणार होता; परंतु अश्विन-जडेजा आणि णि बुमरा बुमरा यांनी त्यांना श्वासही घेण्याची उसंत दिली नाही. 

पहिल्या डावात स्वोपच्या फटक्यांवर धावा करणाऱ्या मोऊन उल हकला आज लेग स्पिपच्चा टॅप लावाला आणि त्यातच त्याला अश्विनने बाद केले. त्यानंतर सलामीवीर शावमनु इस्लाम आणि कर्णधार नजमुल शांतो यांनी चौथ्या विकेटसाठी ५७५ धावांची भागीदारी केली. यादसनात बुमरा, सिराज तसेच आकाशदीन यांचा प्रभाव पडत नव्हता; परंतु त्याचवली जडेजा मदतीला आला आणि त्याचा सरळ चेंडू रिव्हर्सस्वीप मारण्याच्या प्रयत्नात शांतोने आपली यष्टी गमावली तर पुढच्याच षटकात आकाशदीपन अर्धशतक करणाऱ्या शब्दमनला गलीमध्ये झेल देण्यास भाग पाडले. 

आजच्या दिवसातला १७ पटकांचा खेळ होत नाही तोच बांगलादेशने निम्मा संघ ९३ धावांत गमावला होता. लगेचच जडेजाने लिटन दास आणि शकिब अल हसन या भरवशाच्या फलंदाजांना आल्यापायी माघारी धाडले, त्यामुळे बांगलादेशची अवस्था सात बाद ९४ अशी झाली. तोपर्यंत उपाहाराची वेळ झाली होती; परंतु भारतीयांनी वेळ वाढवून घेतला आणि खेळ कायम ठेवला. त्यानंतर बुमराचा खेळ सुरू झाला. त्याने बांगलादेशचे उर्वरित तीन फलंदाज बाद केले आणि त्यांचा खेळ १४६ धावांवर खल्लास केला. ९५ धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी भारतीयांना किती पटके लागणार एवढीच उत्सुकता होती. रोहित शर्मा बाद झाल्यावर यशस्वी जयस्वालने या डावातही अर्धशतकी खेळी साकार केली, त्यामुळे भारताचा विजय उपाहारानंतर काही वेळातब साकार झाला.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश, पहिला डाव २३३ भारत, पहिला डाव ९ बाद २८५ घोषित, बांगलादेश दुसरा डाव १४६ (शादमन इस्लाम ५०, नजमुल हुसैन शांती १९, मुशफिकर रहिम ३७, जसप्रीत बुमरा १०-५-१७-३, आर. अश्विन १५-३० ५०-३, आकाशदीप ८-३-२०-१, रवींद्र जडेजा १०-२-३४-३). भारत, दुसरा डाव १७.२ षटकांत ३ बाद ९८ (यशस्वी जयस्वाल ५१, विराट कोहली नाबाद २९)

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे अव्वल स्थान भक्कम
■ बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात भारताची विजयाची संधी हुकणार, अशी शक्यता होती. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (डब्ल्यूटीसी) महत्त्वाच्या गुणाला मुकावे लागण्याची भीती होती; परंतु भारतीय संघाने मिळालेल्या संधीचे विजयात रूपांतर केले. त्यामुळे डब्ल्यूटीसीमधील अव्वल स्थान अधिक कायम राहिले. ११ सामन्यांत आठ विजय अशी कामगिरी करणाऱ्या भारताची सरासरी ७४.२४ अशी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची सरासरी ६२.५० अशी आहे. भारताचे आता आठ सामने शिल्लक आहेत. यातील तीन न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. भारताने आठपैकी चार सामन्यांत विजय मिळवला, तर इतर देशांच्या मालिकांचा काहीही निकाल लागला तरी भारताचा अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित असेल.

मायदेशात सलग सर्वाधिक मालिका विजय
१८* भारत (२०१३ ते २०२४)
१० ऑस्ट्रेलिया (१९९४ ते २०००)
१० ऑस्ट्रेलिया (२००४ ते २००८)
८ वेस्ट इंडीज (१९७६ ते १९८६)
८ न्यूझीलंड (२०१७ ते २०२०)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय
४१४ ऑस्ट्रेलिया
३९७ इंग्लंड
१८३ वेस्ट इंडीज
१८० भारत
१७९ दक्षिण आफ्रिका

कमीत कमी चेंडूंच्या खेळात कसोटी विजय
२७६ चेंडू इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडीज (ब्रिजटाऊन १९३५)
२८१ चेंडू भारतविरुद्ध आफ्रिका (केपटाऊन २०२४)
३०० चेंडू दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झिम्बाब्वे (केपटाऊन २००५)
३१२ चेंडू भारतविरुद्ध बांगलादेश (कानपूर २०२४)
३२७ चेंडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध आफ्रिका (मेलबर्न १९३२)

दोन्ही डावांत मिळून सर्वोत्तम सरासरी
७.३६ भारत विरुद्ध बांगलादेश (कानपूर २०२४)
६.८० आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे (केपटाऊन २००५)
६.७३ इंग्लंड विरुद्ध पाक (रावळपिंडी २०२२)
६.४३ इंग्लंड विरुद्ध आयर्लंड (लॉर्ड्स २०२३)
५.७३ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (चेस्टर ली स्ट्रिट २००५)

दोन दिवसांचा खेळ न होऊनही मिळवलेले विजय
■ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ड्युनेडिन १९५५)
■ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड .(हेडिंग्ले १९५८)
■ इंग्लंड विरुद्ध आफ्रिका (सेंच्युरियन २०००)
■ न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश .(हॅमिल्टन २००१)
■ न्यूझीलंड वि. बांगलादेश .(वेल्टिंग्टन २०१९)
■ न्यूझीलंड वि. भारत (साऊदम्टन २०२१)
■ इंग्लंड विरुद्ध आफ्रिका . (दी ओव्हल २०२२)
■ भारत विरुद्ध बांगलादेश (कानपूर २०२४