झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. नुकताच झिम्बाब्वे क्रिकेट संघाने सेशेल्सविरूद्ध २८७ धावा करून ट्वेंटी-२० सर्वाधिक धावांच्या यादित तिसरे स्थान मिळवले आहे. परंतु झिम्बाब्वेने गांबियाविरूद्ध ट्वेंटी-२० मधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. झिम्बाब्वेने गांबियाविरूद्धच्या सामन्यात ४ विकेट्स गमावत तब्बल ३४४ धावा केल्या. याआधी नेपाळने २०२३ मध्ये मंगोलियाविरूद्ध ३१४ धावा करत विक्रम रचला होता. परंतु झिम्बाब्वेने आता नेपाळचा विक्रम मोडला आहे व ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणाऱ्या देशांच्या यादित अव्वल स्थान गाठले आहे.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या सलामी फलंदाजांनी स्पोटक फलंदाजीने सामन्याची सुरूवात केली. सहाव्या षटकात सलामीवीर तडिवानाशे मरुमणीने १९ चेंडूत ६२ धावा करून माघारी परतला. झिम्बाब्वेने अवघ्या ६ षटकांमध्ये १०० धावा पुर्ण केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला डायन मेयर्स १२ धावा करून बाद झाला. त्यानंतर सिकंदर रझा फलंदाजीसाठी आला. सिकंदर व सलामीवीर ब्रायन बेनेटने गांबियाच्या गोलंदाजांची तुफान झोडपले. ब्रायन बेनेट ५० धावांवर माघारी परतला. पण पुढे येणारे फलंदाज त्याच अक्रमकतेने फलंदाजी करत राहिले.
रायन बर्लने ११ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सिकंदर रझा व क्लाइव्ह मदंडेने झिम्बाब्वेची धावसंख्या ३०० पार घेऊन गेले व २० षटकांमध्ये ३४४ धावा करून विक्रम रचला. ज्यामध्ये सिकंदर रझाने ४३ चेंडूनमध्ये १३३ धावा करत जलद शतक झळकावले या दरम्यान ७ चौकार व १५ षटकार लगावले. तर क्लाइव्ह मदंडेने १७ चेंडूत ५३ धावांची शतकी खेळी केली. या दरम्यान दोघांनी १४१ धावांची भागीदारी केली.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
३४४- झिम्बाब्वे (विरुद्ध गांबिया) २०२४
३१४- नेपाळ ( विरुद्ध मंगोलिया) २०२३
२९७- भारत (विरुद्ध बांगलादेश) २०२४
२८६- झिम्बाब्वे (विरुद्ध सेशेल्स) २०२४