संपूर्ण भारतीय क्रिकेटचे लक्ष असलेला मोहम्मद शमी पुन्हा मैदानात उतरला. त्याने तीन विकेट मिळवण्याची कामगिरी केली, परंतु विजय हजारे करंडक प्राथमिक उपांत्य फेरीच्या बंगालचा मात्र हरियानाकडून पराभव झाला.
शमी कधी तंदुरुस्त होणार आणि कधी भारतीय संघात परतणार याकडे भारतीय क्रिकेटचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी जसप्रीत बुमरा तंदुरुस्त ठरला नाही, तर शमी संघात हवाच, अशी चर्चा सुरू झाली आहे शमीने या सर्व प्रश्नांना हजारे करंडक सामन्यात खेळून दिलासा दिला आहे. रणजीच्या पहिल्या टप्प्यातील दोन सामन्यांत आणि त्यानंतर मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शमी खेळला होता, मात्र त्यानंतरही त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्यात आले नव्हते. त्याच्या गुडघ्याला पुन्हा सूज आल्याची चर्चा होती. आज शमी पुन्हा मैदानात उतरला आणि त्याने पूर्ण १० षटके गोलंदाजीही केला. त्यामुळे या आठवडाअखेरीस इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी होणाऱ्या संघ निवडतीत शमीचा समावेश असेल, अशी शक्यता वाढली आहे. हरियानाविरुद्धच्या आज झालेल्या या सामन्यात शमीने तीन विकेट मिळवल्या असल्या तरी त्याने १० षटकांत ६१ धावा दिल्या. इतर गोलंदाजांच्या तुलनेत त्या अधिक होत्या, परंतु पूर्ण १० षटके गोलंदाजी केली आणि ५० षटके क्षेत्ररक्षणही केले हे दिलासा देणारे ठरले.
संक्षिप्त धावफलक
हरियाना ५० षटकांत ९ बाद २९८ (पार्थ (पार्थ वत्स ६२, निशांत सिंधू ६४, राहुल तेवटिया २९, सुमीतकुमार नाबाद ४१ ३२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, मोहम्मद शमी १०-०-६१-३, मुकेशकुमार ९-२-४६-२) वि. वि. बंगाल ४३.१ षटकांत २२६ (अभिषेक पॉरेल ५७, सुदीपकुमार घरामी ३६, अनुस्तुप मझमुदार ३६)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter