सर्फराझचे दुलीप करंडकाला प्राधान्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारत बांगलादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. त्याआधी १२ सप्टेंबरपासून दुलीप करंडकाच्या दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल, मात्र पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात निवडण्यात आलेल्या काही खेळाडूंना दुलीप करंडकाच्या दुसऱ्या फेरीतील लढतीपासून विश्रांती देण्यात आली आहे. सर्फराझ खान यालाही भारतीय संघात संधी देण्यात आलेली आहे, मात्र भारत ब संघामध्ये त्याचे स्थान कायम ठेवण्यात आलेले आहे. रिंकू सिंगला संधी देण्यात आली असून शार्दुल ठाकूरकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
 
भारत अ संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल याची निवड करण्यात आली होती, पण गिलसह के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव व आकाश दीप यांची भारताच्या कसोटी संघात निवड झाल्यामुळे दुलीप करंडकातील दुसऱ्या फेरीत त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंऐवजी प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एस. के. राशीद, शम्स मुलानी व आकिब खान यांना भारत अ संघामध्ये निवडण्यात आले आहे. मयांक अगरवाल याच्याकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

भारत व संघामध्ये रिषभ पंत व यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश होता, पण दोघांचीही भारताच्या कसोटी संघात निवड झाल्यामुळे आता या दोघांऐवजी सुयश प्रभूदेसाई, रिंकू सिंग या खेळाडूंची भारत व संघात निवड झाली आहे. हिमांशू मंत्री यालाही या संघात संधी देण्यात आली आहे.

दुलीप करंडकाच्या दुसऱ्या फेरीसाठी सुधारित संघ
भारत अ संघ : मयांक अगरवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा, खलील शाश्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एस. के. राशीद, शम्स मुलानी, आकिब खान. भारत ब संघ : अभिमन्यू इस्वरन (कर्णधार), सर्फराझ खान, मुशीर खान, नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेशकुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी, एन. जगदीशन (यष्टिरक्षक), सुयश प्रभूदेसाई, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री (यष्टिरक्षक).

भारत ड: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सारांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, के. एस. भारत (यष्टिरक्षक), सौरभकुमार, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), निशांत सिंधू, विदवाथ कावेरप्पा. (क संघामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही).

अष्टपैलू खेळाडूचे काय झाले ?
शार्दुल ठाकूरच्या दुखापतीवर जून महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याला तीन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत हा काळ सुरू राहणार होता, मात्र सप्टेंबर महिना उजाडूनही त्याच्या तंदुरुस्तीबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. बीसीसीआयच्या करारानुसार त्याच्या क श्रेणीमध्ये समावेश आहे, मात्र सध्या तरी या अष्टपैलू खेळाडूच्या सद्यस्थितीबाबत बीसीसीआयकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter