कर्णधार रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीचा फोटो शूट व कर्णधारांच्या प्रत्रकार परिषदेसाठी पाकिस्तानात जावे लागणार होते. या बाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय कळवला नव्हता. परंतु आयसीसीच्या नियमानुसार रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जावं लागणार की नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने १६ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम लाहोरमध्ये नियोजित आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी या कार्यक्रमाला मंजूरी दिल्याचेही या म्हटले आहे.
आयसीसीचा नियम काय?
आयसीसी आपल्या सर्व स्पर्धांसाठी नियम बनवत असते. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत आयसीसीचे सर्व नियम ठरलेले असतात. त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हे पाकिस्तानाच होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेची यजमान आहे. त्यामुळे त्यांच्या देशातच ओपनिंग सेरेमनी होणार आहे. यासाठी सर्व कर्णधारांना जाणे बंधनकारक असते.
बीसीसीआयने काय म्हटले...
पाकिस्तानने आयसीसीला सांगितले आहे की, "आम्ही पाकिस्तानात एकही सामना खेळणार नाही. आमचे सर्व सामने हे दुबईत होणार आहे. त्यामुळे रोहित शर्माचा पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे रोहित शर्माला आम्ही पाकिस्तानमध्ये पाठवणार नाही. " पण बीसीसीआयने जरी असे म्हटले असले तरी त्यांना आयसीसीच्या नियमांचे पान करावे लागणार आहे."