तब्बल २२ वर्षांनी पाकचा ऑस्ट्रेलियात मालिका विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह व हारिस रौफ यांची प्रभावी गोलंदाजी व सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघावर आठ विकेट व १३९ चेंडू राखून विजय मिळवला आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. तब्बल २२ वर्षांनंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिकेत विजय संपादन करता आला. याआधी २००२ मध्ये वकार युनुसच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियामध्ये २-१ असा विजय साकारला होता. या लढतीत २४ धावा देत दोन फलंदाज बाद करणाऱ्या हारिस रौफची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने मालिकेत १० फलंदाज बाद करीत मालिकावीराचा मानही संपादन केला.

कांगारु अर्थातच ऑस्ट्रेलियाचा डाव १४० धावांवर आटोपल्यामुळे पाकिस्तानसमोर माफक आव्हान उभे राहिले. सईम अयुब व अब्दुल्ला शफीक या सलामीवीरांनी ८४ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानला विजयासमीप नेले, पण लान्स मॉरीस याने साईम अयुबला ४२ धावांवर आणि अब्दुल्ला शफीकला ३७ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दोघेही एका धावेच्या अंतरात बाद झाले. त्यानंतर मात्र बावर आझम व कर्णधार मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानचा विजय निश्चित केला. बाबर आइामने नाबाद २८ धावांची आणि मोहम्मद रिझवानने नाबाद ३० धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियन संघ आगामी दिवसांमध्ये भारतीय संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका डोळ्यांसमोर ठेवून पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघामध्ये पाच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व जॉश हेझलवूड या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका यजमान ऑस्ट्रेलियाला बसला. एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेता ऑस्ट्रेलिया अखेरच्या लढतीत जॉश इंग्लिस याच्या नेतृत्वात मैदानात उत्तरले. या लढतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांचे आव्हान थोपवून लावता आले नाही. 

शॉन अॅक्टने ३० धावांची आणि मॅथ्यू शॉर्टन २२ धावांची खेळी केली, पण कोणालाही मोठी खेळी करता आली नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १४० धावांवरच आटोपला. शाहीन शाह आफ्रिदीने ३२ धावा देत तीन फलंदाज बाद केले, तसेच नसीम शाहने ५४ धावा देत तीन फलंदाज बाद केले. ऑस्ट्रेलियन संघ आगामी दिवसांमध्ये भारतीय संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका डोळ्यांसमोर ठेवून पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघामध्ये पाच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व जॉश हेझलवूड या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका यजमान ऑस्ट्रेलियाला बसला. एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेता ऑस्ट्रेलिया अखेरच्या लढतीत जॉश इंग्लिस याच्या नेतृत्वात मैदानात उत्तरले. या लढतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांचे आव्हान थोपवून लावता आले नाही.

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया - ३१.५ षटकांत सर्व बाद १४० धावा (मॅथ्यू शॉर्ट २२, अॅरोन हाडीं १२, शॉन अॅक्ट ३०, अॅडम ॉम्पा १३, शाहीन शाह आफ्रिदी ३/३२, नसीम शाह ३/५४) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया २६.५ षटकांत दोन बाद १४३ धावा (सईम अयुब ४२, अब्दुल्ला शफीक ३७, बाबर आझम नाबाद २८, मोहम्मद रिझवान नाबाद ३०).