इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच द्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मोहम्मद शमीचे वर्षभरानंतर पुनरागमन झाले आहे.१९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक अंतिम सामन्यात मोहम्मद शमो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. गुडघा आणि पोटरी दुखापतीचा त्याला त्रास झाला होता. रणजी स्पर्धेचे काही सामने आणि त्यानंतर मुश्ताक अली आणि आता विजय हजारे करंडक स्पर्धेत तो खेळला होता. त्यातूनच शमीच्या तंदुरुस्तीचे आणि पुनरागमनाचे संकेत मिळाले होते.
सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे; मात्र इंग्लंडविरुद्ध या पाच टी-२० मालिकेनंतर होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा संघ मात्र आज निवडण्यात आला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतणाऱ्या संघातील वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना या टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. इतरांना विश्रांती देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराची विश्रांती अपेक्षित होती.भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिका खेळला होता. ती मालिका ३-१ अशी जिंकली होती, त्या वेळी संघात असलेल्या रमणदीप सिंग, जितेश शर्मा, आवेश खान, यश दयाल, विजयकुमार व्यैशक यांना वगळण्यात आले असून त्यांच्याऐवजी, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची निवड करण्यात आली आहे.
अपयशावर चर्चा ?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भवितव्य निश्चित करणारी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशाचे पोस्टमार्टेम करणारी प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगकर आणि बीसीसीआय पदाधिकारी यांच्यातील बैठक आज मुंबईत झाल्याचे समजते अगोदर न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात अशा पाठोपाठ दोन मालिका गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढावली. यात प्रामुख्याने रोहित आणि विराट
कोहली यांचे अपयश ठळकपणे दिसून आले, त्यामुळे बैठकीत या दोघांच्या कामगिरीवरच रोख होता.
भारतीय संघ आता परिवर्तनाच्या पातळीवर आहे. त्यामुळे बदल करायचे झाले तर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपासून की स्पर्धेनंतर बदल करायचे यावरही मोठी चर्चा झाली.इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाच सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबईत होणार आहेत.
संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.
चॅम्पियन्स स्पर्धेसाठी आज घोषणा ?
■ दरम्यान, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी बैठक झाल्याचे समजते; परंतु संघ जाहीर करण्यासाठी उद्याची अंतिम मुदत असल्याने निवडलेला संघ उद्या जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्तीचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला.