'जामिया'च्या मुलींनी मिळवले विजेतेपद

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेली काही वर्ष सातत्याने विविध खेळात महाराष्ट्रातल्या महिलांची कामगिरी दखल घेण्याजोगी राहिलेली आहे. महाराष्ट्रातल्या महिला शक्तीचं हे उदाहरण म्हणता येईल. नुकत्याच पार पडलेल्या BITS ओपन स्पोर्ट्स मीट-२०२४ च्या विजेतेपदाची घोषणा झाली आहे. 

जामिया मिलिया इस्लामियाच्या (JMI) मुलींच्या बास्केटबॉल संघाने यंदाचे विजेतेपद पटकावले आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) - पिलानीद्वारे १८  ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण १४ संघांनी सहभाग घेतला होता. 

अंतिम सामन्यात जेएमआय संघाने धडाकेबाज कामगिरी करत दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी महाविद्यालयाच्या संघाचा पराभव करत स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. जेएमआयच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी आणि संघकार्य दाखवून प्रतिस्पर्ध्यांना मात देत ट्रॉफी मिळवली.

 
जेएमआयचे प्रभारी कुलगुरू प्रा. मोहम्मद शकील यांनी अनोख्या कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन केले. त्यांच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले. कुलगुरूंनी संघाला त्यांच्या खेळातील भावी आयुष्यात अधिक यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.