गोलंदाजीत जसप्रीत बुमरा पहिल्या स्थानावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 22 h ago
जसप्रीत बूमराह
जसप्रीत बूमराह

 

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३२ फलंदाज बाद करणाऱ्या बुमराने ठसा उमटवला. ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका जिंकली असलो तरी भारताकडून बुमराने प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे त्याला कारकीर्दीतील ९०८ अशी सर्वोत्तम रेटिंग प्राप्त करता आलो. 

आयसीसी कसोटीतील गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमरा याच्याखेरीज भारताचा एकमेव गोलंदाज अब्बल १० जणांच्या यादीत आहे. रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर असून, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्णायक कामगिरी बजावणारा स्कॉट बोलंड हाही जडेजासह संयुक्तपणे नवव्या स्थानावर आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर आहे. इतर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुमार कामगिरी करीत असताना यशस्वीने मात्र कडवी झुंज दिली. रिषभ पंतलाही ऑस्ट्रेलियामध्ये सूर गवसला नाही, मात्र तो नवव्या स्थानावर आहे. 

जडेजा पहिल्या स्थानी
आयसीसी कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा पहिल्या स्थानावर आहे. ४०० रेटिंगची कमाई केली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल १० खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजाखेरीज भारताचा एकही खेळाडू नाही. अक्षर पटेल याची १२व्या स्थानावर घसरण झाली आहे. 

ऑस्ट्रेलिया टॉपवर
आयसीसी कसोटी संघाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ १२६ रेटिंगसह टॉपवर अर्थातच पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकन संघ ११२ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. याच दोन देशांमध्ये जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय संघाची १०९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. 

कसोटी क्रमवारी
  • अव्वल पाच देश
  1. ऑस्ट्रेलिया (१२६ रेटिंग) 
  2. दक्षिण आफ्रिका (११२ रेटिंग)
  3. भारत (१०९ रेटिंग) 
  4. इंग्लंड (१०५ रेटिंग) 
  5. न्यूझीलंड (९७ रेटिंग)
  • अव्वल पाच फलंदाज
  1. ज्यो रुट (८९५ रेटिंग) 
  2. हॅरी ब्रुक (८७६ रेटिंग) 
  3. केन विल्यमसन (८६७ रेटिंग) 
  4. यशस्वी जयस्वाल (८४७ रेटिंग) 
  5. ट्रॅव्हीस हेड (७७२ रेटिंग). 
  • अव्वल पाच गोलंदाज
  1. जसप्रीत बुमरा (९०८ रेटिंग) 
  2. पेंट कर्मिस (८४१ रेटिंग)
  3. कागिसो रबाडा (८३७ रेटिंग) 
  4. जॉश हॅझलवूड (८३५ रेटिंग) 
  5. माकों यान्सेन (७८५ रेटिंग). 
  • अव्वल पाच अष्टपैलू 
  1. रवींद्र जडेजा (४०० रेटिंग) 
  2. माकों यान्सेन (२९४ रेटिंग) 
  3. मेहदी हसन (२८४ रेटिंग) 
  4. पेंट कमिंस (२८२ रेटिंग) 
  5. शाकीव उल हसन (२६३ रेटिंग)

    'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

    Awaz Marathi WhatsApp Group 
    Awaz Marathi Facebook Page

    Awaz Marathi Twitter