सौदी अरेबीयादील जेद्दाह या ठीकाणी २४ व २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्स संघाने १२ कोटी ५० लाख रूपयांत खरेदी केले. सिसाजने गेली ७ वर्ष आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचे नेतृत्व केले. पण सिराज आता आपल्याला गुजरात टायटन्स या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. सिराजने आरसीबीला इंस्टाग्राम पोस्ट करत निरोप दिला. ज्यावर गुजरातचा फिरकीपटू राशिद खानने मजेशीर कमेंट केली.
सिराजसाठी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज व रायस्थान रॉयल्स संघांमध्ये लिलाव रंगला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडे RTM कार्डचा वापर करून सिराजला संघात कायम ठेवण्याची संधी होती. परंतु सिराजसाठी आरसीबीने आरटीएम कार्डचा वापर केला नाही आणि सिराज १२ कोटी ५० लाख रुपयांसह गुजरात टायटन्स संघामध्ये दाखल झाला.
७ वर्ष आरसीबीसाठी आयपीएल खेळणाऱ्या सिराजने भावनिक इंस्टाग्राम पोस्ट लिहित आरसीबीला निरोप दिला. पोस्टमध्ये सिराज म्हणाला, आरसीबीमधील सात वर्ष माझ्या हृदयाच्या फार जवळ आहेत. 'आरसीबीच्या जर्सीमधील मी माझा काळ आठवतो त्यावेळी माझे हृदय कृतज्ञता, प्रेम आणि भावनांनी भरलेले असते.' अशा प्रकारच्या आशयाची पोस्ट लिहित सिराजने आरसीबी संघाला निरोप दिला.
सिराजचा आगामी आयपीएल हंगामात होणार सहकारी आणि गुजरात टायटन्स संघातील फिरकीपटू राशिद खान याने पोस्टवर आपुलकीची प्रतिक्रिया व्यक्त केली. पोस्टवर कमेंट करत राशिद म्हणाला, 'अब तू हमारा हुआ."
आरसीबीच्या सोशल मीडिया हॅंडलवरून देखील सिराजचे आभार व्यक्त करण्यात आले. पोस्टमध्ये लिहिले होते, "तुझ्या योगदानाबद्दल धन्यवाद डीएसपी सिराज. तु आमच्यासाठी मैगदानावर, मैदानाच्या बाहेर व सोशल मीडियावर स्टार होतास. आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. "