IPL 2024 : कोलकाता ठरले चॅम्पियन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 6 Months ago
कोलकाता नाइट रायडर्स जल्लोष साजरा करताना
कोलकाता नाइट रायडर्स जल्लोष साजरा करताना

 

वेंकटेश अय्यरने १० व्या षटकात त्याचे अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने कोलकाताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानेच ११ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विजयी धाव घेतली. कोलकाताने १०.२ षटकात ११४ धावांचं लक्ष्य पूर्ण करत तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. इतकेच नाही, तर चेन्नईमध्ये त्यांनी २०१२ नंतर दुसऱ्यांदा आयपीएल जिंकले.

अंतिम सामन्यात वेंकटेश अय्यर २६ चेंडूत ५२ धावांवर नाबाद राहिला, तर श्रेयस अय्यर ६ धावांवर नाबाद राहिला.

गुरबाजला शाहबाज अहमदनं धाडलं माघारी
कोलकाताला विजयासाठी अवध्या ११ धावांची गरज असताना गुरबाजला शाहबाद अहमदने ३९ धावांवर पायचीत केले.

केकेआरची आक्रमक फलंदाजी, पाचव्या षटकातच पार केलं अर्धशतक
हैदराबादच्या कर्णधारानं सुनिल नारायणला 6 धावांवर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. मात्र पॉवर प्लेमधील केकेआरचा आक्रमकपणा कमी झाला नाही. त्यांनी 5 षटकात 1 बाद 52 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने 7 चेंडूत नाबाद 21 तर गुरबाजने 20 चेंडूत 20 धावा केल्या.

हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड
आंद्रे रसेलने पॅट कमिन्सला 24 धावांवर बाद करत हैदराबादचा डाव 113 धावात संपुष्टात आणला. हैदराबादने आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा अप्रिय विक्रम आपल्या नावावर केला. रसेलने आपली तिसरी शिकार केली.

केकेआर हैदराबादला शंभरच्या आत गुंडाळणार?
हर्षित राणाने हेन्री क्लासेनचा 16 धावांवर त्रिफळा उडवत हैदराबादला 90 धावांवर आठवा धक्का दिला. यामुळं हैदराबाद शंभरी तरी पार करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हैदराबाद 12 षटकातच पराभवाच्या छायेत; कर्णधार कमिन्स सावरणार का डाव?
कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादची अवस्था 12 षटकात 7 बाद 77 धावा अशी केली.

हैदराबादची अवस्था बिकट; क्लासेन अन् मारक्रमवरच भिस्त
हर्षित राणाने नितीश रेड्डीला बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला होता. त्यानंतर माक्ररम आणि क्लासेनने डाव सावरत संघाला 10 षटकात 60 धावा पार करून दिल्या. मात्र रसेलने माक्ररमला बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला.

हैदराबादसाठी पॉवर प्ले ठरला वाईट; पाच षटकात पडल्या तीन विकेट्स
केकेआरच्या मिचेल स्टार्कने राहुल त्रिपाठीला 9 धावांवर बाद करत हैदराबादला पॉवर प्लेमध्येच तिसरा धक्का दिला. यामुळे हैदराबादची अवस्था 4.2 षटकात 3 बाद 21 धावा झाल्या होत्या.

स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का
वैभव अरोराने ट्रॅविस हेडला शुन्यावर बाद करत हैदराबादला दुसऱ्या षटकात दुसरा धक्का दिला. यामुळे हैदराबादची अवस्था 6 धावा अशी झाली.

स्टार्कचा पहिल्याच षटकात दणका; हैदराबादला दिला धक्का
मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात हैदराबादला पहिला धक्का दिला. त्याने अभिषेक शर्माचा 2 धावांवर त्रिफळा उडवला.

टॉस उडवला अय्यरनं जिंकला कमिन्स; आयपीएलचा कोण होणार विजेता
श्रेयस अय्यरने टॉस उडवला अन् कमिन्सनं टॉस जिंकला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अय्यरने नाणेफेकीनंतर आम्ही जर नाणेफेक जिंकली असती तरी बॉलिंगच केली असती असं सांगितलं.

कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद यांच्यातील हेड टू हेडमध्ये केकेआर फार पुढे आहे. केकेआरने आतापर्यंत हैदराबादविरूद्ध 18 सामने जिंकले आहेत. तर सनराईजर्स हैदराबादने केकेआरला फक्त 9 वेळा मात दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्स राखून पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. केकेआरने 2014 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी केकेआरने आयपीएल जिंकली.

हैदराबादचे 113 धावांचे आव्हान केकेआरने 10.3 षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने नाबाद 26 चेंडूत 52 धावा केल्या. तर सलामीवीर गुरबाजने 39 धावांचे मोठे योगदान दिले.

कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा डाव 113 धावात गुंडाळला. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर मिचेल स्टार्क, हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. वैभव अरोरा, चक्रवर्ती आणि नारायणने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या. माक्ररमने 20 तर त्याच्या खालोखाल हेन्री क्लासेनने 16 धावांचे योगदान दिलं. हैदराबादचे तब्बल सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.