भारतीय संघ आमच्यापेक्षा कैकपटीने श्रेष्ठ - मोहम्मद रिझवान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 9 d ago
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान

 

चॅम्पियन ट्रॉफीचा पाचवा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव झाला.  पराभवानंतर पाकिस्तान कर्णधार मोहम्मद रिजवान आपल्या चेहऱ्यावर निराशा लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “आपण म्हणू शकतो की आमची मोहीम संपली आहे. हे सत्य आहे. कर्णधार म्हणून मला दुसऱ्या संघावर अवलंबून राहायला आवडत नाही. जर तुम्ही चांगले असाल, तर तुम्ही ते जिंकून आणि गोष्टी तुमच्या हातात ठेऊन दाखवता. इतर संघांच्या निकालांची वाट पाहणे मला आवडत नाही. जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे भारत आणि न्यूझीलंडने आम्हाला हरवले. आम्ही ते स्वीकारतो. त्यांनी मजबूत खेळ केला आणि आम्ही चांगला खेळ केला नाही. जर आम्हाला एखादी संधी मिळाली तर ती मिळाली तर ठीक आहे.”

सोमवारी न्यूझीलंडने बांगलादेशला हरवल्यानंतर पाकिस्तानच्या या स्पर्धेतून बाहेर पडण्याची घोषणा झाली.  तीन ICC व्हाईट बॉल टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानी संघाचे नॉकआउटमधून बाहेर पडण्याचे उदाहरण आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला २०२३ च्या ODI वर्ल्ड कप आणि २०२४ च्या T20 वर्ल्ड कपमध्येही लीग स्टेजमध्येच पराभव स्वीकारावा लागला.

रिजवानने सांगितले, “पाकिस्तानच्या पराभवाचे एक मोठे कारण म्हणजे आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करताना कमी धावांचा केल्या. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही नक्कीच निराश होता. त्यामुळे वेगवेगळे प्रश्न उभे राहतात. आमच्या संघाच्या बैठकीत आम्ही  २७० -२८०  धावांचे लक्ष ठेवले होते.  कारण आऊटफिल्ड आणि पिच स्लो होती. आम्ही २८० धावा केल्या असत्या, तर निकाल वेगळा असता. साऊद आणि मी एक भागीदारी निर्माण करण्यासाठी वेळ घेतला. त्यानंतर आमचे शॉट निवडी चुकीचे होत्या. यामुळे त्यांना विकेट्स घेण्याची संधी मिळाली आणि आमच्या मिडल ऑर्डरवर दबाव निर्माण झाला.” 

तो पुढे म्हणला, “भारताचे प्रयत्न अधिक होते, ते आम्हा पेक्षा धाडसी होते. म्हणूनच त्यांना निकाल मिळाला. जेव्हा आम्हाला काही क्षणांत अधिक धाडस दाखवण्याची गरज होती, तेव्हा आम्ही ते केले नाही. आमच्या फिल्डिंगमध्ये आम्हाला अधिक ऊर्जा दाखवणे आवश्यक होते. पण त्यातही आम्ही कमी पडलो. आम्ही काही महत्त्वाच्या कॅचेस गमावले. त्यामुळे आम्ही हरलो.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter