बार्सिलोना पैरा स्विमिंग वर्ल्ड सीरीज चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
स्विमिंग वर्ल्ड चैंपियनशिपसाठी निवड झालेला पैरा स्विमर्स शम्स आलम
स्विमिंग वर्ल्ड चैंपियनशिपसाठी निवड झालेला पैरा स्विमर्स शम्स आलम

 

स्पेनमधील बार्सिलोना येथे पैरा स्विमिंग वर्ल्ड सीरीज चॅम्पियनशिप होणार आहे. त्यासाठी नुकतीच भारतीय पैरा स्विमिंग टीमच्या ३० सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये १६ पुरुष (१४ सीनियर आणि २ जूनियर) आणि ६ महिला स्विमर्सचा समावेश आहे. तसेच यामध्ये चार मुस्लिम स्विमर्सचादेखील समावेश आहे. टीममध्ये ८ कोच आणि सपोर्ट स्टाफ देखील असणार आहे. या स्पर्धेत भारतीय टीम १७ ते २३ मार्च २०२५ दरम्यान सहभागी होणार आहे. 

भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीम सदस्यांना सरकारकडून एअरफेअर, एंट्री फी, निवास, प्रवास विमा, स्थानिक वाहतूक आणि इतर संबंधित खर्चांसाठी एकूण ९२,१०,९३० रुपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

भारत सरकारकडून या आयोजनासाठी आर्थिक स्वीकृती देण्यात आली आहे. यामध्ये ७५% अग्रिम रक्कम म्हणून ३७,८२,९४० रुपये आधीच दिले केले गेले आहेत. टीमच्या सर्व सदस्यांना, तसेच कोच आणि सपोर्ट स्टाफला ₹१७,४०० प्रति सदस्याच्या दराने OPA (ऑनलाइन प्रवेश शुल्क) दिले जाईल.

एअरफेअर खर्च सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल. तसेच इतर खर्च ही स्पर्धा संपल्यानंतर बिल प्राप्त झाल्यावर दिला जाईल. सर्व टीम सदस्य आणि अधिकारी स्पर्धेनंतर एक अहवाल सादर करणार करतील. त्यामध्ये  त्यांचे प्रदर्शन, उपलब्धी आणि मीडिया कवरेजच्या चित्रांचा समावेश असणार आहे.

सरकारच्या या  पुढाकाराने भारतीय पैरा स्विमिंग टीमला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले प्रदर्शन दाखवण्यासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे. ही टीम भारतीय पैरा स्विमिंगचा भविष्याचा तारा असून  जगभर आपली प्रतिभा दाखवायला जात आहे. या आर्थिक मदतीमुळे खेळाडूंना आवश्यक संसाधने उपलब्ध होण्यास मदत होईल. सरकार खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठिंबा देण्यासाठी सातत्याने सहकार्य करत आहे.
 
मोहम्मद शम्स आलम शेख विषयी 

शम्स आलम यांचा जन्म १७ जुलै १९८६ रोजी बिहारच्या मधुबनी येथील राठोस गावात झाला. आलम यांना लहानपणापासूनच पोहण्याचा छंद होता. शम्स आलम यांनी आपले संपूर्ण बालपण मधुबनीतच घालवले. त्यांनी मुंबईत  एका सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे. याचवेळी  त्यांनी मार्शल आर्ट शिकायला सुरूवात केली आणि विविध पदके जिंकली. पोहणे आणि मार्शल आर्ट्समध्ये असलेला त्यांच्या उत्कटतेने त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये एक मजबूत दावेदार म्हणून प्रेरित केले.

मोहम्मद शम्स आलम यांना आधी गुवाहाटी येथे आयोजित राष्ट्रीय पैरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये आपला खेळ दाखवला आहे. त्यांनी या स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.

पैरा स्विमिंग वर्ल्ड सीरीज चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ 
 
पुरुष खेळाडू:
  • अफरीद मुख्तार अत्तार (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • समीर बर्मन (१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • अजय हिंदुराव भोसले (५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाइल)
  • बी. आर. वी. भव्यानी कार्तिक (१०० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर बटरफ्लाई)
  • अली इमाम (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • सुयश जाधव (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर बैकस्ट्रोक, २०० मीटर इंडिविजुअल मेडली)
  • छैतन्य विश्वास (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • गोपीनाथ लिंगुतला (२०० मीटर इंडिविजुअल मेडली)
  • श्रिदी नागप्पा मलगी (५० मीटर फ्रीस्टाइल, ४०० मीटर फ्रीस्टाइल)
  • अजीबुर रहमान होला (१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • निरंजन मुकुंदन (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर फ्रीस्टाइल, ५० मीटर बटरफ्लाई, २०० मीटर इंडिविजुअल मेडली)
  • तेजा नादाकाम (१०० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर बैकस्ट्रोक)
  • हिमांशु नंदल (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर बैकस्ट्रोक, २०० मीटर इंडिविजुअल मेडली)
  • इगेरोयित ग्रिग (१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • मोहम्मद शम्स आलम शेख (१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • हरि शंकर सूर्यनारायण (४०० मीटर फ्रीस्टाइल)
महिला खेळाडू:
  • वैष्णवी विनोद जगताप (१०० मीटर फ्रीस्टाइल)
  • सथि मोंडल (१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक)
  • शशृति विनायक नाकडे (१०० मीटर बटरफ्लाई)
  • देवांशी सासा (५० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर फ्रीस्टाइल)
  • किरण टाक (२०० मीटर इंडिविजुअल मेडली)
  • गरिमा धनंजय व्यूस (१०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, २०० मीटर इंडिविजुअल मेडली)
कोच आणि सपोर्ट स्टाफ
या टीममध्ये अनेक प्रशिक्षक, सहायक कर्मचारी आणि वैद्यकीय स्टाफ आहेत. हे सर्वजण खेळाडूंच्या प्रदर्शनासाठी काम करतील. टीमचे प्रमुख कोच शरथ महादेवराव असतील. त्यांच्या नेतृत्वात टीम बार्सिलोना मध्ये आपली आव्हानात्मक स्पर्धा खेळेल.

हे आयोजन भारतीय पैरा स्विमिंग समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले प्रदर्शन दाखवण्याची संधी मिळेल. भारताला पैरा स्विमिंगच्या क्षेत्रात अधिक यश मिळवण्यासाठी मार्ग तयार होईल. या पावलामुळे भारताच्या पैरा अॅथलीट्सला सशक्त करण्यात येईल आणि त्यांच्या कडक परिश्रमांना योग्य ओळख मिळेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter