भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला २१४ धावात ऑलआऊट करून १४२ धावांनी हा सामना जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने इंग्लंडचा व्हाईटवॉश करत मालिका जिंकली आहे.
टीम इंडियाकडून हर्षिदीप सिंग,हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. तर वॉशिग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा मोठा विजय आहे. सामन्यात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी ६.२ ओव्हरमध्ये ६० धावांची पार्टनरशीप केली. या दोघा खेळाडूंची बॅटींग पाहता इंग्लंड सहज हे लक्ष्य गाठेल असे वाटत होते. मात्र अर्शदीप सिंगने गोलंदाजीला येऊन ही पार्टनशीप मोडून काढली. त्याने दोन्ही सलामीचे फलंदाज बेन डकेटला ३४ आणि सॉल्टला २३ धावावर बाद केले होते.
त्यानंतर कुलदीप यादवने बँटनला झेलबाद केले. त्यानंतर जो रूटला अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून २४ धावांवर बाद केले. हर्षित राणाने कर्णधार जोस बटलरला ६ धावांवर बाद केले त्यानंतर हर्षितने हॅरी ब्रुकला (१९) बाद केले.लियम लिग्विस्टन ६, आदील राशीदने शुन्य धावा, मार्क वुडने ९ धावा, साकिब महमुदने ९ धावा केल्या होत्या. गस अटकिस्टन या खेळाडूने ३८ धावा करून एकाकी झूंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील अपयशी ठरला. त्यामुळे इंग्लंड २१४ धावात ऑलआऊट झाली आणि टीम इंडियाने १४२ धावांनी हा सामना जिंकला.