२०२५मध्ये टीम इंडिया खेळणार 'हे' सामने

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
भारतीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट संघ

 

भारतीय क्रिकेट संघाने २०२४ या वर्षात अनेक चढ उतार पाहिले... भारतीय चाहत्यांची दिवाळी गोड केली, ती ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून. २००७ नंतर भारताने पहिल्यांदाच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. झिम्बाब्वे, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला संघ गेला. पण, तेथे संमिश्र कामगिरीवर आपल्याला समाधान मानावे लागले. २०२४ चा शेवट तरी गोड होईल अशी अपेक्षा होती, परंतु कालच मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या कसोटीत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.

सरत्या वर्षाच्या कटू आठवणी मागे सोडून, गोड आठवणी तयार करण्यासाठी टीम इंडियाला आता सज्ज व्हावे लागेल. आर अश्विनच्या निवृत्तीने टीम इंडियात स्थित्यंतराचा कालावधी सुरू झाला आहे, हे स्पष्ट झाले आहे. IND vs AUS पाचव्या कसोटीनंतर कदाचित रोहित शर्मा निवृत्ती घेऊ शकतो. पण, येणारे २०२५ हे वर्ष भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटमय असेल हे नक्की.

नवीन वर्षात भारत सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवी कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ही कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी भारताला जिंकणे महत्त्वाचे आहे. सिडनी कसोटी जिंकून भारत WTC Final च्या शर्यतीत राहिल खरा, परंतु त्यांना Sri Lanka vs Australia या मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असेल. टीम इंडियाने २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर २०१७ मध्ये फायनलमध्ये त्यांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे आणि भारताचे सामने दुबईत होणार आहेत. उर्वरित संघ पाकिस्तानमध्ये स्पर्धेचे सामने खेळतील. भारताने अंतिम फेरी गाठल्यास अंतिम सामना दुबईत खेळवला जाईल. आशिया चषक २०२५ स्पर्धाही होणार आहे आणइ ती पण हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्यात येण्याचा अंदाज आहे.

भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक 
जानेवारी २०२५ - ऑस्ट्रेलिया दौरा, सिडनी पाचवी व शेवटची कसोटी

जानेवारी-फेब्रुवारी २०२५ - इंग्लंडचा भारत दौरा ( ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका)

फेब्रुवारी-मार्च २०२५ - चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ( संपूर्ण वेळापत्रक येथे क्लिक करा)

जून-ऑगस्ट २०२५ - इंग्लंड दौरा ( पाच कसोटी सामन्यांची मालिका )

ऑगस्ट २०२५- बांगलादेश दौरा ( तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका)

ऑक्टोबर २०२५ - वेस्ट इंडिजचा भारत दौरा ( २ कसोटी )

ऑक्टोबर २०२५ - आशिया चषक ट्वेंटी-२० ( यजमान)

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ - ऑस्ट्रेलिया दौरा ( ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका)

नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ - दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा ( दोन कसोटी, तीन वन डे आणि ५ ट्वेंटी-२० )