पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम काल केला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने २० पदकं जिंकली आणि टोकियोतील १९ पदकांचा विक्रम मोडला. टोकियोमध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १९ पदके जिंकली होती. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ३ सुवर्ण, ८ रौप्य व १० कांस्य अशा एकूण २० पदकांसह भारत पदकतालिकेत १९व्या क्रमांकावर आहे.

भारताची आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी असून खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. पॅरिसमधील पदकतालिकेत चीन पहिल्या, ग्रेट ब्रिटन दुसऱ्या, तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटि्स क्रीडा प्रकारात भारताचा पगडा भारी राहिला. भारताने अ‍ॅथलेटि्समध्ये एकूण १० पदके जिंकली आहेत. बॅडमिंटनमध्ये ५, नेमबाजीमध्ये ४, तर तिरंदाजीमध्ये १ पदक जिंकले आहे. सुमित अंतिल ( भाला फेक) , नितेश कुमार ( बॅडमिंटन) आणि अवनी लेखरा ( नेमबाजी) यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.

निशद कुमार व शरद कुमार उंच उडी, योगेश कथुनीया थाळी फेक, अजित सिंग भाला फेक, सुहास एल.वाय बॅडमिंटन, तुलसीमाथी मुरूगेसन, नरेश नरवाल १० मिटर एअर पिस्तुल यांनी रौप्य पदक जिंकली आहेत. १० कांस्यपदकांमध्ये शितल देवी व राकेश कुमार मिश्र दुहेरी तिरंदाजी, मरियप्पन थंगवेलू उंच उडी, सुंदर सिंग गुर्जर भालाफेक , महिलांची १०० मिटर शर्यत प्रीती पाल, महिलांची २०० मिटर शर्यत, महिलांची ४०० मिटर शर्यत दीप्ती जेवानजी, मनिषा रामदास बॅडमिंटन, निथ्या सिवान बॅडमिंटन, रूबीना फ्रान्सीस १० मिटर एअर पिस्तुल, मोना अगरवाल १० मिटर एअर पिस्तूल यांच्या पदकांचा समावेश आहे.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर मेन्स क्लब थ्रो मध्ये धर्मबीरने सुवर्णपदक आणि प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावले. भारताने आतापर्यंत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्य पदके जिंकली आहेत.

भारत बुधवारी २५ पदकांच्या जवळ पोहोचला होता. सचिन खिलारीच्या रुपाने रौप्य पदकाने दिवसाची सुरुवात झाली. धरमबीर आणि प्रणव सुरमा यांनी मेन्स क्लब थ्रो स्पर्धेत भारताला दोन पदके मिळवून दिली. पुरुषांच्या क्लब थ्रो F51 फायनलमध्ये धरमबीरने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले, तर प्रणव सूरमाने रौप्यपदक जिंकले. भारताच्या एकुण पदकांची संख्या २४ झाली आहे. धरमबीरने चौथ्या प्रयत्नात ३४.९२ मीटर फेक केला. प्रणव सुरमाने पहिल्याच प्रयत्नात ३४.५९ मीटर फेक केला.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter