भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गाजवली आहे. मेलबर्न कसोटीवरही जसप्रीतने दोन्ही डावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याचा त्याला फायदा झाला आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत जसप्रीतने त्याची अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. त्याचसोबत तो भारताकडून सर्वाधाकि गुण मिळवणारा कसोटी गोलंदाज बनला आहे. जसप्रीतचे ९०७ रेटिंग गुण आहेत आणि त्याने माजी फिरकीपटू आर अश्विन ( ९०४) याचा डिसेंबर २०१६ सालचा विक्रम मोडला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत हा ९०७ गुणांसह जागात इंग्लंडच्या डेरेक उंडरवूडसह संयुक्तपणे १७व्या क्रमांकावर आहे.
बुमराहच्या कारकिर्दीत २०२४ हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे. बुमराहने सर्वच फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यामुळे Sir Garfield Sobers Trophy या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी निवडलेल्या ४ खेळाडूंमध्ये बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. बुमराहसोबतच या पुरस्काराच्या शर्यतीत इतर तीन खेळाडू असणार आहेत. ज्यामध्ये जो रूट (इंग्लंड), ट्रॅव्हिस हेड, (ऑस्ट्रेलिया), हॅरी ब्रुक (इंग्लंड), या खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी मेन्स क्रिकेटर कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी देखील बुमराहला नामांकन मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानेही १५ रेटींग गुणांच्या सुधारणेसह तिसऱ्या क्रमांकावर कूच केली आहे. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने सहा विकेट्स घेतल्या होत्या. कमिन्सने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही तिसरे स्थान पक्के केले आहे. त्याने मेलबर्न कसोटीत ९० धावाही केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सेन याने ७ विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि ६ क्रमांक वर सरकून तो पाचव्या स्थानी आला आहे. त्याने कारकीर्दित प्रथमच ८०० रेटींग गुणांची कमाई केली आहे.
Highest Test Bowling Ratings for India -
९०७ - जसप्रीत बुमराह ( २०२४)
९०४ - आर अश्विन ( २०१६)
८९९ - रवींद्र जडेजा ( २०१७)
८७७ - कपिल देव ( १९८०)
८५९ - अनिल कुंबळे ( १९९४)
फलंदाजांमध्ये भारताचा यशस्वी जैस्वाल एक पायरी वर चढून चौथ्या क्रमांकावर आला आहे, तर स्टीव्ह स्मिथ १०व्या क्रमांकावरून सातव्या स्थानी सरकला आहे. सौद शकील ( सहावा) व नितीश कुमार रेड्डी ( ५३) यांच्याही क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.
ट्वेंटी-२० क्रमवारीत झिम्बाब्वेचा सीन विलियम १९व्या क्रमांकावर आला आहे. ब्रेंडन टेलर ( २०१४) याच्यानंतर आयसीसी क्रमवारीत झिम्बाब्वेच्या फलंदाजाने घेतलेली ही सर्वोत्तम झेप आहे. श्रीलंकेच्या पथूम निसंका तिन स्थान वर सरकून फलंदाजांमध्ये टॉप फाईव्हच्या जवळ पोहोचला आहे. मिचेल सँटनर हा गोलंदाजांमध्ये टॉप टेनमध्ये आला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter