सर्वोत्तम खेळाडूच्या स्पर्धेत 'हे' चार खेळाडू शर्यतीत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
जो रुट, कामिंदू मेंडिस, हॅरी ब्रुक आणि जसप्रीत बुमराह
जो रुट, कामिंदू मेंडिस, हॅरी ब्रुक आणि जसप्रीत बुमराह

 

वर्ष २०२४ संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीकडून आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आयसीसीकडून ४ नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात भारताच्या १, इंग्लंडच्या २ आणि श्रीलंकेच्या १ खेळाडूचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी रोहित शर्मा नव्हे, तर जसप्रीत बुमराहच्या नावाचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या जो रुट, हॅरी ब्रुक आणि श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसच्या नावाचा समावेश आहे.

कसोटीत बुमराहची धमाल कामगिरी 
जसप्रीत बुमराह भारतीय संघातील सर्वात मोठा मॅचविनर आहे. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज असते, तेव्हा तेव्हा तो संघाला विकेट काढून देत असतो. यावर्षीही त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याच्या या वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ७१ गडी बाद केले आहेत.

जो रुट
 इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटची बॅट देखील यावर्षी चांगलीच तळपली. यावर्षी फलंदाजी करताना त्याने १७ सामन्यांमध्ये १५५६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ शतक आणि ५ अर्धशतक झळकावली. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात केलेली २६२ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. या दमदार कामगिरीसाठी त्याला नामांकन मिळालं आहे. 

कामिंदू मेंडिस 
श्रीलंकेचा स्टार फलंदाज कामिंदू मेंडिसने यावर्षी फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. त्याने यावर्षी फलंदाजी करताना ९ सामन्यांमध्ये १०४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७४.९२ च्या सरासरीने धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने सलग २ दुहेरी शतकं झळकावली. 

हॅरी ब्रुक 
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रुकने यावर्षी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने यावर्षी फलंदाजी करताना १२ सामने खेळले. यादरम्यान त्याने ११०० धावा केल्या. त्याने ५५ च्या सरासरीने धावा करत १ त्रिशतक आणि ३ अर्धशतकं झळकावली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter