भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात असून दुसरा सामना एडलेडच्या मैदानावर खेळवण्यात आला आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने भारताचा पराभव करत एडलेडमध्ये पुन्हा एकदा त्याचचं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं आहे. या विजयामुळे या सिरीजमध्ये आता १-१ अशी बरोबरी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाला मिळालेलं छोटं टार्गेट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९ धावांचं लक्ष्य दिलं होतं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात १७५ रन्सवर माघारी परतली. त्यामुळे या पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया अजिंक्य असल्याचं दिसून आलंय.
दुसऱ्या डावात टीम इंडियाची खराब कामगिरी
दुसऱ्या डावात भारतीय टीमची सुरुवात चांगली झाली नाही. 12 रन्सच्या स्कोअरवर केएल राहुलने विकेट गमावली. त्यानंतर यशस्वी जयस्वालही स्कॉट बोलंडच्या बॉलवर २४ रन्सवर बाद झाला. दुसर्या डावात चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र तो काही विशेष करू शकला नाही. त्याने 21 चेंडूंचा सामना करत 11 रन्स केले. त्यानंतर शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल झाले. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांनी दुसऱ्या दिवसाच्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाला आणखी तोटा होऊ दिला नाही.
तिसऱ्या दिवशी भारतीय टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषभ पंतच्या रूपाने धक्का बसला. त्यानंतर नितीश रेड्डी याने काही तुफानी शॉर्ट खेळवले पण तो कमिन्सचा बळी ठरला. नितीशने दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक ४२ रन्स केले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter