Champions Trophy : आज तोडगा निघणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

वेळापत्रक जाहीर होणे लांबणीवर पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसंदर्भात उद्या आयसीसीची महत्त्वपूर्ण बोर्ड मीटिंग होत आहे. परंतु भारताचा नकार आणि पाकिस्तानची ताठर भूमिका यामध्ये आयसीसीची कुचंबणा झाली आहे. 

आयसीसीच्या प्रमुख सदस्यांची हो बैराक उथा ऑनलाइन होत आहे. कोणत्याही परिस्थितीत आमबा संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास पाठवला जाणार नाही, या बीसीसीआयच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. स्पर्धा नियोजनानुसार खेळवायची असेल , तर हायब्रिड मॉडेलनुसार  खेळवावी यावर बीसीसीआय ठाम आहे. पाकिस्तानमध्ये अशा कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाही. त्यामुळे यातून कसा मार्ग काढायचा, हा प्रश्न आयसीसीसमोर आहे. 

सद्य परिस्थितीत हायब्रिड महित हाय योग्य मार्ग दिसून येत आहे. स्पर्धेचे भवितव्य टिकवायचे असेल, तर इतर सर्व सदस्य या मॉडेलला पसंती देतील, भारत आणि पाकिस्तानशिवाय ही स्पर्धा होणे योग्य नाही, असे आयसीसीच्या सूत्रांनी पीटीआय बोलताना सांगितले. 

भारत-पाकिस्तान शिवाय चॅम्पियन्स करंडक स्पर्धा झाली, तर त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो, स्पर्धेचे महत्वही कमी होऊ शकते, हा मुद्दा आयसीसी सदस्य पाकिस्तान क्रिकेट मंडळाला सांगत आहेत. स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेले विओ-स्टार यांच्याकडूनही आयसीसीच्या प्रमुख अधिका-यांशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर स्पर्धेचे केळापत्रक जाहीर करण्याचा आग्रह केलेला आहे. 

काय असू शकेल तोडगा 
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही आणि पाकिस्तान त्यांच्याच देशात खेळण्यावर ठाम आहे. अशा स्थितीत भारत-पाक साखळी सामना होणे कठीण आहे. त्यामुळे या दोन्ही संघांचा वेगवेगळ्या गटात समावेश करण्याचा विचार केला जात आहे, मात्र हा तोडगा प्रक्षेपण हक्क असलेल्या कंपनीला मान्य होणार नाही, कारण, भारत- पाक साखळी सामना हा अंतिम सामन्यापेक्षा अधिक उत्पन्न देणारा आणि प्रसिद्धीही मिळवणारा सामना असतो आणि या दोन संघांत बाद फेरीचा सामना झाला तर तो बोनसच असतो, पण बाद फेरीचेही सामने आम्ही पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतलेली असल्यामुळे हायब्रीड मॉडलसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले,  

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचा संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास गेलेला नाही. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही जाणार नाही, असे स्पष्ट मत बीसीसीआयकडून वारंवार व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आयसीसीही बीसीसीआयवर दबाव टाकू शकत नाही. 

पाकिस्तान धुमसतेय 
खेळाडूंच्या सुरक्षिततेवरून भारतीयच संघ पाकमध्ये पाठवला जात नाही, मात्र दुसरीकडे आता पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने इस्लामाबादमध्ये राजकीय उद्रेक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलनामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पाक दौऱ्यावर असलेला श्रीलंका अ संघ तातडीने मायदेशी परतला आहे. माजी पंतप्रधान ड्रागन खान यांच्या सुटकेसाठी ही आंदोलने होत आहेत. 

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे स्वतः पाकिस्तानचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांनीच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे, पण बॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या संयोजनात या आंदोलनाचा परिणाम होणार नाही, असा विश्वास पाक क्रिकेट मंडळ व्यक्त करत आहे 

उद्या होणाऱ्या बैठकीत ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळवावी यासाठी आयसीसी आग्रह धरेल. साखळी सामने दुबईमध्ये आणि बाद फेरीचे सामने पाकिस्तानमध्ये असा पहिला प्रस्ताव असू शकतो आणि भारत जर बाद फेरीत गेला, तर भारताचे बाद फेरीचे सामने पुन्हा दुबईत खेळले जातील, असा पुढचा पर्याय असू शकतो, पण त्याप्त पाक मंडळ तयार होण्याची शक्यता कमी आहे.
  
असा आहे करार 
कोणत्याही जागतिक स्पर्धेच्या वेळापत्रकात स्पर्धा सुरू होण्याच्या ९० दिवस अगोदर जाहीर करण्याचा करार ब्रॉडकास्टर आणि आयसीसी यांच्यात झालेला आहे, परंतु १० दिवसांपेक्षा कमी कालावधी उरलेला आहे. 

तर नुकसान पाकिस्तानचेच 
पाकिस्तानने आपला हट्ट सोडला नाही, तर पूर्ण स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवली जाण्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते, परंतु त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचेच नुकसान होईल. भारतात पुढील काही वर्षात मोठ्या स्पर्धा होत आहेत. त्या वेळी पाक मंडळ भारतात न जाण्याचा मार्ग स्वीकारू शकतो, परंतु मुळात आर्थिक परिस्थिती डबघाईची असलेल्या पाक मंडळाला कोणत्याही स्पर्धातून माघार घेणे परवडणारेच नाही, असेही आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter