चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा तोंडावर आली असताना भारतीय युवा गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी संघात दावा ठोकला आहे.
भारतीय फिरकीपटू वरूण चक्रवर्थीने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ६ सामन्यांमध्ये एकूण १८ विकेट्स घेतले. ज्यामध्ये त्याने आज तमीळनाडू संघाकडून खेळताना राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट्स हॉल पूर्ण केला. त्याने ९ षटकांत ५२ धावा देत फायफर मिळवला. वरूणने आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले. आता त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवच्या संघातील स्थानाला धोका निर्माण झाला आहे.
वरूण चक्रवर्थीची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी
२/३६ : विरूद्ध उत्तर प्रदेश
२/३९ : विरूद्ध जम्मू आणि काश्मिर
१/४९ : विरूद्ध विदर्भ
५/९ : विरूद्ध मिझोरम
३/३४ : विरूद्ध छत्तीसगड
५/५२ : विरूद्ध राजस्थान
त्याचबरोबर २०२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स घेणारा अर्शदीप सिंगही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्तम लयमध्ये पाहायला मिळत आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपने स्पर्धेत एकूण १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील संघात अर्शदीप स्थान मिळवण्याच्या तयारीत असून संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्या स्थानाला पर्याय निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
अर्शदीप सिंगची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी
१/६७ : विरूद्ध नागालॅंड
२/४८ : विरूद्ध कर्नाटक
५/३८ : विरूद्ध मुंबई
१/८७ : विरूद्ध सौराष्ट्र
४/५० : विरूद्ध हैद्राबाद
४/१९ : विरूद्ध पॉंड्यूचेरी
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज :
वरूण चक्रवर्थी ( तमीळनाडू) : १८ विकेट्स
अर्शदीप सिंग (पंजाब) : १७ विकेट्स
सीटी गजा (गुजरात) : १६ विकेट्स
एसएस घोष (बंगाल) : १५ विकेट्स
अरझान नागवासवाला (गुजरात) : १४ विकेट्स
रघू शर्मा (पंजाब) : १४ विकेट्स
प्रणव कारिया (सौराष्ट्र) : १४ विकेट्स