चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं. भारताचे सर्व सामने दुबईत होणार हे स्पष्ट झाले आहे. आज-उद्या करता करता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे या स्पर्धेचे यजमानपद असले तरी भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसारच होणार आहे. भारताने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याने २०२३च्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलनुसार होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यांची घोषणा केली, जी पाकिस्तान आणि UAE मध्ये १९ फेब्रुवारी ते ९मार्च दरम्यान होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये शेवटची झाली होती आणि त्यानंतर ती पुन्हा होतेय. गतविजेत्या पाकिस्तान १९९६ नंतर त्यांच्या पहिल्या जागतिक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद करणार आहे. १९ दिवसीय स्पर्धेत बांगलादेश, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे गट अ गटात, तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे ब गटात असतील.लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील स्टेडियम्स पाकिस्तानमधील सामने आयोजित करतील, तर दुबई युएईमध्ये सामने आयोजित करेल.
आयसीसीला पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक जाहीर करताना आनंद होत आहे. २०१७ नंतर ही स्पर्धा होत आहे, असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी म्हटले. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हे पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जे सर्वोच्च स्तरावर क्रिकेटला चालना देण्याच्या आमची वचनबद्धता अधोरेखित करते.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक
१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
२४ फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
९ मार्च - फायनल - गद्दाफी स्टेडियम, लाहोर
उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर तो सामना दुबईत होईल. पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी २ सामना लाहोर येथे होईल जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाईल.