आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. गौतम गंभीरच्या लखनौचा खेळाडू नवीन-उल-हकने शानदार गोलंदाजी केली पण फलंदाजी करताना त्यांचा संपूर्ण संघ फ्लॉप झाला. यासह या संघाचे विजेतेपदाचे स्वप्नही अपूर्ण राहिले.
आपल्या चमकदार कामगिरीनंतरही विराट कोहलीशी भांडण करणारा नवीन-उल-हक त्याच्या गोड आंब्याच्या टिप्पणीमुळे ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर आंब्याचा फोटो शेअर करून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीनला डिवचलं.
लखनौकडून नवीन-उल-हकने सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र त्याने चार षटकांत ३८ धावाही दिल्या. नवीनने कर्णधार रोहित शर्माचे ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनचे विकेट्स घेतले. केवळ त्याच्या जीवघेण्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात २०० च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत.
लखनौ सुपर जायंट्ससाठी ही सलग दुसरी वेळ आहे जेव्हा हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचूनही ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला आहे. अशा परिस्थितीत नवीन-उल-हकला धडा शिकवण्याचे काम यावेळी मुंबईचे तीन खेळाडू संदीप वारियर, विष्णू विनोद आणि कुमार कार्तिकेय यांनी केले. त्यांनी गांधीजींच्या तीन माकडांच्या स्टाईलमध्ये आंब्याच्या चित्रासह पोज दिली. एक प्रकारे ते नवीन उल हकला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते की, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका आणि वाईट ऐकू नका.