कझाकस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत अहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी या भारताच्या अव्वल मानांकित महिला दुहेरी जोडीने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत त्यांनी भारतासाठी पहिले महिला दुहेरी कांस्यपदक जिंकले आहे. अहिका आणि सुतिर्था यांची जोडी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी बनली आहे.
जागतिक महिला दुहेरी क्रमवारीत १५व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम न्योंग आणि ली युन्हे यांचा पराभव करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. परंतु उपांत्यफेरीत जागतिक जपानच्या मिवा हारिमोटो आणि मियु किहारा या जागतिक क्रमवारीत ३३व्या क्रमांकाच्या जोडीने ३-० (४-११, ९-११, ९-११) ने पराभूत केले. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
मुखर्जीं जोडीने मागच्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये भारताला पहिले पदक (कांस्यपदक) मिळवून देले होते. तर, जागतिक टेबल टेनिस (WTT)स्पर्धेमध्येही या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून पहिली भारतीय जोडी होण्याचा मान मिळवला.
पुरुष गटात, अचंता शरथ कमल, मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांच्या संघला उपांत्य फेरीत चायनीज संघाकडून ०-३ ने पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे पुरूष संघालाही कांस्यपदकावर सामाधान मानावे लागले. त्यांचे या स्पर्धेत हे सलग तिसरे पदक आहे.
भारताने आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कांस्यपदकासह विजयाची सुरूवात केली. भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत ८ कांस्यपदके जिंकली आहेत.