अर्शद नदीम 'असा' बनला ऑलिम्पिकचा विक्रमवीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 5 Months ago
अर्शद नदीम
अर्शद नदीम

 

पाकिस्तानच्या भालाफेकपटू अर्शद नदीमने पेरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक इव्हेंटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी ९२.९७ मीटर दूर भाला फेकून नवीन ऑलंपिक रेकॉर्ड केला आणि गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. यापूर्वी नॉर्नच्या अॅथलीट थोरकिल्डसेन एंड्रियासने २००८ मध्ये बीजिंग  ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटरचे रेकॉर्ड केले होते, जे आता नदीमने मोडले आहे. हा पाकिस्तानच्या इतिहासातील पहिला प्रसंग आहे, ज्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये एखाद्या खेळाडूने व्यक्तिगत स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहे.

आर्थिक अडचणींवर मात करीत स्वप्न साकारले
अर्शद नदीमचे वडील एक कामगार होते आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे नदीमला पॅरिस ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना वर्गणी गोळा करावी लागली आणि जुने भाले वापरून तयारी करावी लागली. त्यांनी पाकिस्तानी क्रीडा प्रशासनाला नवीन भाल्याची मागणी केली होती, पण ती पूर्ण झाली नाही. त्यांच्या जुन्या भाल्यानेच त्यांनी आपल्या कौशल्याचा विकास केला.

शाळेपासून सुरू झाले चॅम्पियन बनण्याचे स्वप्न 
एका मुलाखतीत, अर्शद नदीमने सांगितले की त्यांनी लहानपणी आपल्या वडिलांसोबत नेजाबाजीचा खेळ पाहिला आणि त्याच्याशी आवड निर्माण केली. त्यानंतर त्यांनी जैवलिन थ्रोमध्ये रस घेऊन प्रॅक्टिस सुरू केली. शाळेच्या स्पर्धेत त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली गेली आणि कोच रशीद अहमदने त्यांना प्रशिक्षित केले.

सरकारी नोकरीच्या शोधात
आठ भावंडांपैकी तिसरे असलेल्या नदीमच्या कुटुंबाची स्थिती चांगली नव्हती. त्यांच्या वडिलांनी मजुरी करून त्यांची काळजी घेतली आणि प्रॅक्टिसमध्ये अडथळा येऊ नये म्हणून दूध आणि तुपाची सोय केली. नदीमचे सरकारी नोकरीचे स्वप्न होते आणि त्याने पाकिस्तान वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट अथॉरिटीसाठी ट्रायल्स देखील दिले होते. पाकिस्तानच्या स्टार जैवलिन थ्रोअर सैय्यद हुसैन बुखारीने त्यांना पाहून त्यांचे करिअर उंचावले.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी चंदे गोळा करीत प्रशिक्षण
नदीमच्या वडिलांनी सांगितले की, नदीमच्या प्रशिक्षणासाठी मित्र, गावातील लोक आणि नातेवाईकांनी पैसे दिले. त्यांनी सांगितले की, नदीमने या यशापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या मेहनतीमुळे आणि लोकांच्या आशीर्वादाने ते इथे पोहोचले आहेत. नदीमने २०११ मध्ये अॅथलेटिक्समध्ये पाऊल ठेवले आणि २०१५ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रीय चॅम्पियन बनला. तर २०२२ मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते.
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter