क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने इतिहास घडवला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 14 h ago
Afghanistan beat South Africa
Afghanistan beat South Africa

 

अफगाणिस्तान संघाने वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ १०६ धावांवर तंबूत पाठवल्यानंतर अफगाणिस्तानने २६ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यास विजयाची नोंद केली.

आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रिझा हेंड्रिक्स ( ९), टॉनी डी जॉर्जी ( ११) , कर्णधार एडन मार्करम ( २, त्रिस्तान स्तब्स ( ०), कायले वेरेयने ( १०) आणि जेसन स्मिथ ( ०) यांना माघारी पाठवून आफ्रिकेची अवस्था ७ बाद ३६ अशी केली होती. एँडील फेहलुकवायो शून्यावर रन आऊट झाला. वियान मुल्डर व बीजॉर्न फॉर्टूइन ४० धावा जोडल्या. मुल्डरने ८४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. फारुकीने ही विकेट घेतली. आफ्रिकेचा डाव ३३.३ षटकांत १०६ धावांवर आटोपला. फारुकीने ४, घाझनफरने तीन आणि राशिदने दोन विकेट्स घेतल्या.

अफगाणिस्तानचा रहमनुल्लाह गुरबाज भोपळ्यावर माघारी परतला. रहमत शाहही ८ धावाच करू शकला. अफगाणिस्तानने ४ फलंदाज ६० धावांवर गमावले. पण, अझमतुल्लाह ओमारजाई ( २५) व गुलबदीन नइब ( ३४) यांच्या नाबाद खेळीने संघाला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. बी जॉर्न फॉर्च्युनने दोन विकेट्स घेतल्या.