विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लीम सहकाऱ्यांना पूजेचा मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात श्री गणरायाची आरती करताना मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलिम शेख व विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचे इतर पदाधिकारी.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात श्री गणरायाची आरती करताना मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलिम शेख व विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचे इतर पदाधिकारी.

 

धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्या घटनांचे प्रमाण हल्ली वाढताना दिसत असले तरी एकमेकांच्या धर्माविषयी आदर आणि प्रेम असलेल्यांची संख्याही समाजात कायमच जास्त राहिलेली आहे. ही मंडळी आपल्या कृतीतून कळत नकळतपणे धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवत असतात. याचेच एक उदाहरण गणेशोत्सवानिमित्त सोलापूरमध्ये पाहायला मिळाले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मचारी संघटनेकडून गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गणरायाची आरती विद्यापीठातील मुस्लिम कर्मचारी बांधवांनी करून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अनेक उपक्रम राबवले जातात. गेल्या ७-८ वर्षापासून विद्यापीठ परिसरात विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व कर्मचारी भक्तीभावाने यामध्ये सहभागी होतात. त्यातच शुक्रवारी (ता. २२) विद्यापीठातील मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलिम शेख आदी मुस्लीम कर्मचारी बांधवांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यामुळे विद्यापीठ कर्मचारी संघटनेने या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश दिला आहे. संपूर्ण १० दिवस विविध कार्यक्रमातून उत्सव साजरा केला जातो. महाप्रसादाचेही सर्वांना वाटप केले जाते.

यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल थोरात, सचिव रविकांत हुक्किरे, खजिनदार हरिष गारमपल्ली, मार्गदर्शक सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, परीक्षा प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, संगमेश्वर मठ, प्रशांत भोसले, पंकेश व्हनमाने, शिवा बोराळे, मेजर ताटे, हणमंत लोखंडे, महेश पवार, सदानंद भादुले आदी उपस्थित होते. 

- प्रकाश सनपूरकर, सोलापूर  

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻 

 

‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय


हिंदू मुस्लीम धार्मिक सलोखा जपणारे भद्रकाली तलावडी मित्र मंडळ


मुस्लिम कारागिर साकारत आहेत नगरमधील श्री विशाल गणेश मंदिर


गणरायाच्या पूजेसाठी मुस्लीम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू


गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लीम

 

धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

 

श्रीगणेशाला अभिवादन करणारे उर्दू साहित्य

 

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम


लातूरच्या मुस्लिम बांधवांनी घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय


गणेशोत्सवादरम्यान साताऱ्यातील मुस्लिम समाजाने घेतला मोठा निर्णय

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube