विधानसभेसाठी 'या' वेबसाईटवरून नोंदवा मतदार यादीत नाव

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 4 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

देशभर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षाचे नेते विधनसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. उमेदवारांची चाचपणी, जनतेसाठीची आश्वासणे याची तयारी सर्व पक्ष करत आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे असल्यास सर्व नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे आहे. २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून त्यावेळी मतदारांच्या नावात दुरुस्ती किंवा हयात असताना मयत दाखविले किंवा नाव नोंदवूनही यादीत नाव नाही, अशांना हरकत घेऊन यादीत समाविष्ट होण्याची संधी मिळणार आहे.  

भारत हा लोकशाहीने नटलेला देश आहे. संविधानाने सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहे. या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीची मतदार यादी ग्राह्य धरली जाण्याची शक्यता आहे. अद्याप हे निश्चित झालेले नसले तरी याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांनी आताच नाव नोंदविल्यास त्या मतदारांना जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समित्या, नगरपालिकांची निवडणुकीतही मतदान करण्याची संधी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यआडो २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. 

प्रारूप यादी नीट पहा
साडेपाच हजार बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी जावून मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, दुबार नावे काढून टाकण्याची मोहीम सुरू आहे. २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून त्यावेळी ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत किंवा हयात असतानाही मयत असल्याची नोंद आहे, नावातील बदलाची दुरुस्ती झालेली नाही, त्यांनी त्यावर आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. नाहीतर विधानसभेला मतदान करता येणार नाही.

कोठे करणार नोंदणी? 
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मतदार नोंदणी सुरू आहे. १ जुलैला ज्या मतदाराला १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार यादीत नाव नोंदवून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांना voters.eci.gov.in आणि voter helpline app या ठिकाणी नाव नोंदविता येणार आहे. २५ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter