"पाणी हा विषय निवडून आम्ही महाराष्ट्रात काम सुरू केले. विकेंद्रित पाणलोट व्यवस्थापन केलेल्या गावांना पाणी कमी पडत नाही हे लक्षात आले. दुसऱ्या बाजूला असे करण्यासाठी एकत्र न आलेल्या गावांना पाणी पुरत नव्हते. गावे एकत्र येऊन काम सुरु झाल्यानंतर प्रश्न मिटू लागले. त्यामुळे गावे एकत्र आली तर समस्या संपतील",असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी केले.
देशातील प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावे. पाणी वाचविण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी आम्ही थोडेसे योगदान दिले. त्यासाठी मला आईकडून प्रेरणा मला मिळाल्याचे आमीरने यावेळी नमूद केले.
एकत्र काम करून पाणी प्रश्न सुटू शकतो - आमीर खान
राज्यातील काही गावांचा अभ्यास करून पाणी प्रश्नावर आम्ही काम केले. विकेंद्रित पाणलोट व्यवस्थापनावर एकत्र काम केल्यानेच त्या गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. पण एकत्र न आलेल्या गावांना पाण्याची समस्या आज भेडसावत आहे. अशा वेळी गावांनी एकत्र येऊनच पाणी प्रश्नावर काम करायला हवे. तरच पाण्याची समस्या संपेल,’ असे प्रतिपादन आमीर खान याने केले. 'पुढील काही वर्षे आम्ही पाणी या विषयावर आणि कृषी प्रश्नांवर काम करणार आहोत. महाराष्ट्राला दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना कायम प्रयत्नशील असेल', अशीही ग्वाही यावेळी आमीर खानने दिली.
...तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील - फडणवीस
याच अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्रात पाण्याची ५० टक्के कमतरता असते. हा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेणे गरजेची आहेत. हा प्रश्न सोडविता येऊ शकतो. पण जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकत नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.
फडणवीस यांनी यावेळी २०२० मध्ये केंद्र सरकारच्या एक पानी तक्ता अहवालात सर्व राज्यांमधील पाण्याच्या पातळीची आकडेवारी देण्यात आली होती. ज्यात पाणी पातळी खाली न गेलेले आणि पाणी पातळी वाढलेले एकमेव राज्य महाराष्ट्र होते. आपल्या राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त जमीन कोरडवाहू असून सिंचनासाठी काम करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पाण्याचा प्रश्न आणखी परिणामकारक पद्धतीने सोडवावा लागेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
जल, जंगल आणि जमीनवर काम करावे - शरद पवार
देशातील बहुतांश समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला जल, जंगल आणि जमीन या क्षेत्रात काम करायला हवं. यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घ्यावा. आतापर्यंत अनेक समस्यांवेळी जैन समाजाने समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी अपेक्षा जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, वल्लभ भन्साळी, प्रफुल्ल पारेख, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विठ्ठल मणियार, ‘जितो’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, विजय दर्डा, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, डॉ. चैनराज जैन, कोमल जैन, सरला मुथा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.