नकारात्मक राजकारणाचा पराभव - नरेंद्र मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 4 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitterनवी दिल्ली : 

‘‘महाराष्ट्रात विकासवादाचा, सुशासनाचा आणि खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला असून खोटेपणा, कपट, विभाजनकारी शक्ती, नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा अतिशय वाईट पराभव झाला आहे,’’ अशा शब्दांत  भाजप-महायुतीच्या महाविजयाचे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. लांगुलचालनाचा सामना कसा करायचा हे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले असे मोदींनी सांगितले.

महाराष्ट्रात १५२ जागांवर निवडणूक लढून ८७.५० टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने १३२ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर आज सायंकाळी राजधानी दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपच्या मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांना मोदींनी संबोधित केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. 

महाराष्ट्रातील या विजयासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘परममित्र’ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कौतुक करतो, असे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘सर्व जुने विक्रम मोडीत काढणाऱ्या या ऐतिहासिक महाविजयासह महाराष्ट्राने भाजप-रालोआला लागोपाठ तिसऱ्यांदा आशीर्वाद दिला असून भाजपच्या सुशासनाच्या मॉडेलवर शिक्कामोर्तब केले आहे."

 "लागोपाठ तिसऱ्यांदा जनादेश देणारे महाराष्ट्र हे गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाना आणि मध्य प्रदेशानंतर सहावे राज्य ठरले आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये कुठल्याही निवडणूकपूर्व आघाडीचा हा सर्वांत मोठा विजय आहे. लागोपाठ तिसऱ्यांदा स्थैर्याला कौल देणाऱ्या महाराष्ट्राने दाखविलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही’’, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

आपल्या संबोधनात नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी...
  • देशाला आता केवळ विकास हवा आहे हे सिद्ध झाले 
  • आम्ही ‘एक है तो सेफ है’ असा एकजुटीचा संदेश दिला 
  • आम्ही आमच्या संस्कृतीचा सन्मान करतो, म्हणून जगात आमचा सन्मान  
  • विरोधकांना देशाच्या भावना कधीही समजल्या नाहीत
  • काँग्रेसचा एकही नेता बाळासाहेब ठाकरेंच्या धोरणांची प्रशंसा करत नाही
  • काँग्रेसचा पाखंड जनतेने फेटाळला 
  • देशात केवळ राज्यघटनाच चालेल

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter