सोलापूरच्या उर्दू घरात असा साजरा झाला अल्पसंख्याक दिन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
उर्दू घरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. गढ़वाल, नूर अहमद मुल्ला, रियाज कुरणे
उर्दू घरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. गढ़वाल, नूर अहमद मुल्ला, रियाज कुरणे

 

सोलापूर येथील उर्दूघरच्या सांस्कृतिक समितीच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रा. डॉ. अब्दुल रहीम गदवाल यांचे व्याख्यान झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नूर अहमद मुल्ला उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार रियाज कुरणे यांनी भूमिका बजावली.  यावेळी डॉ. गदवाल यांनी सांगितले, की भारतातील अल्पसंख्याक, संविधानातील अल्पसंख्याकांचे हक्क, स्वातंत्र्य आणि त्याचे महत्त्व आणि इतिहास याविषयी सविस्तर माहिती दिली.  

अल्पसंख्यांक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यवस्थापक राजा बागवान यांनी उर्दू घरच्या कार्याचा परिचय करून दिला.  प्रा. डॉ. मो. शफी चोबदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उर्दू घरचे सदस्य आसिफ इक्बाल, सरफराज बिलोल खान, मजीद शेख आणि मोहम्मद अयाज यांनी स्वागत केले. 

यावेळी उर्दू घरचे ग्रंथपाल साहिर नदाफ, शरीफ इंदिवाले, मेहबूब कुमठे, रफिक खान, हारून हांजगीकर, आसिफ मुजावर, इस्हाक बाटघर, ख्वाजा जेटफूल, हसीब नदाफ, गफूर सौदागर, अबुल हसन आदी उपस्थित होते. उर्दू घरचे सदस्य महेमूदनवाज जहागीरदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हारून रशीद बागवान यांनी आभार मानले. 

उर्दू घर म्हणजे काय? 
महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा आणि उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण उभारले जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. सध्या नांदेड, मालेगाव, सोलापूर आणि नागपूर येथे उर्दू घरे उभारण्यात येत आहेत. नांदेड आणि मालेगाव येथील उर्दू घराचे काम पूर्ण झाले आहे.

नुकतेच राज्याच्या अल्पसंख्यांक कल्याण विभागाने सोलापूरमध्ये आणखी एका उर्दू घराच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. या उर्दू घरासाठी शासनाच्यावतीने ९ कोटी रुपये अनुदानित करण्यात आले आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter