गो ग्रीन पुणे मोहिमेच्या रॅलीत प्रदूषणमुक्त पुण्याचा संदेश

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
सैफी बुरहानी एक्सपो तर्फे शहरात राबवण्यात आलेला 'गो ग्रीन पुणे' उपक्रम
सैफी बुरहानी एक्सपो तर्फे शहरात राबवण्यात आलेला 'गो ग्रीन पुणे' उपक्रम

 

पुणे शहर वाहन उद्योग क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील ५० टक्के वाहने पुणे शहरात निर्माण होतात तर, हे शहर सर्वाधिक वाहन असलेले शहर म्हणून पण ओळखले जाते. पुणे शहराचा विस्तार वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. चांगले वातावरण लाभलेल्या पुणे शहरातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दाउदी बोहरा समाजाच्या वतीने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

सैफी बुरहानी एक्सपो पुणे २०२५ तर्फे पुणे शहरात रविवारी (ता. २९) गो ग्रीन पुणे मोहीम पार पडली. ही मोहिमेची सुरुवात कॅम्पपासून हिरवा झेंडा दाखवत झाली. ते पुढे हडपसर, फातिमानगर, वानवडी, एमजी रोड, लक्ष्मी रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे विद्यापीठ रोड, बंड गार्डन रोड, कल्याणी  नगर, विमान नगर, डेक्कन कॉलेज ते पुन्हा कॅम्पमध्ये सांगता झाली. या  रॅलीमधून लोकांना प्रदूषणमुक्त पुणे चा संदेश देण्यात आला. तसेच त्याविषयीची जनजागृती देखील करण्यात आली. 

या उपक्रमात लहान मुलांपासून वृद्धांचा देखील समावेश होता. शेकडो गाड्यांसह हातात फलकपत्रके घेऊन नागरिक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये मोइज़ जमाली, हुज़ेफा परदावाला, कुरेश घोडनादिवाला, फखरुद्दीन चोपड़ावाला, हमजा छत्रिस हे देखील सहभागी होते.

सैफी बुरहानी एक्सपो पुणे यांनी हरित पुणे मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उ्द्देशाने गो ग्रीन पुणे रॅलीचे आयोजन केले होते. सैफी बुरहानी एक्सपो गेल्या तीन वर्षांपासून कार्यक्रमाचे आयोजन करत आले आहे. यंदा सैफी बुरहानी एक्सपो पुणे २०२५ डेक्कन कॉलेज ग्राऊंडवर ४ ते ६ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राज्य कर उपआयुक्त संजीव पाटील, आयकर आयुक्त नितिन वाघमोडे, पोलीस आयुक्त सुनील काशीद पाटील, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.