अमरनाथ यात्रेसाठी चार लाख भाविकांनी केली नोंदणी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 9 d ago
प्राथनिधिक चित्र
प्राथनिधिक चित्र

 

यंदाची अमरनाथ यात्रा २९ जून २०२४ रोजी सुरू होत आहे. ५२ दिवस चालणाऱ्या शिवाय भक्तिने आणि उत्साहाने भरलेल्या अमरनाथ यात्रेत दरवर्षी लाखो भाविक सहभागी होत असतात. यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून तब्बल चार लाख भाविकांनी नोंदणी केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या यात्रेची नोंदणी प्रक्रिया १५ एप्रिल पासून करण्यात आली होती. 

यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कर्मचारी तैनात 
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी पहलगाम आणि बालताल असे दोन मार्ग आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अमरनाथ यात्रेच्या मार्गावर अधिकच्या व्यवस्था करण्यात येत आहेत. यामध्ये भोजन,थांबण्यासाठी कॅम्प आणि आरोग्य तपासणी व्यवस्थेचा समावेश करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी जम्मू-काश्‍मीर पोलिस, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल , राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

जम्मू-काश्‍मीरचे नायब राज्यपाल आणि श्री अमरनाथ देवस्थान मंडळाचे अध्यक्ष मनोज सिन्हा हे अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बालताल येथे भेट देणार आहेत.

तसेच  जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उधमपूर ते बनिहाल दरम्यान उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ३६० अंशाच्या कोनात सर्वत्र नजर ठेवणारे असे दहा कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावर बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महामार्गावरील अगदी बारीकसारीक हालचालीही टिपता येणार आहेत. यासाठी विशेष नियंत्रण कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे.

अमरनाथ यात्रेच्या रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे 
  • पाच पासपोर्ट साईज फोटो 
  • आधारकार्ड 
  • मतदार ओळखपत्र   


यात्रा मार्ग
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter