मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात येतात. दरम्यान २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद येत आहे. यामुळे यंदाच्या ईद-ए-मिलाद च्या मिरवणूका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहेत. मुस्लिम समुदायाकडून याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समुदायातील बंधुत्व जोपासण्याच्या उददे्शाने तसेच दोन्ही सण निर्विघ्न आणि शांततेत पार पडावेत या उद्देशाने ईदच्या मिरवणूका एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बुधवारी भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियाँ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी जुलूस एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी उपस्थित होते.
मुस्लीम समाजाच्या अशाच निर्णयासंदर्भातील ह्याही बातम्या वाचा 👇🏻
‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय
अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश
जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय
किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे
अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय
नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
WhatsApp | Telegram | Facebook |