अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात आढावा बैठक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात आढावा बैठक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद- ए- मिलाद उत्सव एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलादची मिरवणूक जिल्ह्यात ग्रामीण भागातील इतर ठिकाणी २९ सप्टेंबर, तर धुळे शहरात ३० सप्टेंबरला काढण्याचा सकारात्मक निर्णय घेत मुस्लिमबांधवांनी सलोखा, एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठक झाली. 

जिल्हाधिकारी अभिनव गोयल अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक निर्णय
गणेशोत्सवात यंदा गुरुवारी म्हणजेच २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तसेच ईद- ए- मिलाद सण आहे. हे दोन्ही सण- उत्सव एकाच दिवशी येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यासाठी अनंत चतुर्थीऐवजी ईद- ए- मिलादची मिरवणूक एक किंवा दोन दिवसांनी काढावी, अशी सूचनावजा अपेक्षा जिल्हा प्रशासनातर्फे सिरत कमिटीच्या सदस्यांसह बैठकीस उपस्थित मुस्लीमबांधवांकडे व्यक्त करण्यात आली.

याबाबत उपस्थित मुस्लीमबांधवांनी प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती धुळे शहरातील ईद- ए- मिलादची मिरवणूक शनिवारी (ता. ३०) काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरीक्त जिल्ह्यातील इतर ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका शुक्रवारी (ता. २९) काढण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

मिरणुकांबाबत सूचना
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मिरवणुकांमध्ये मोठ्या काठ्यांव्दारे झेंडे फिरविले जाणार नाहीत. काही अक्षेपार्ह घोषणाबाजी अगर हावभाव, आरडाओरड करण्यात येणार नाही. याबाबत काळजी घेवून येणारे सण, उत्सव शांततेने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सिरत कमिटीचे सदस्य, मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

गणेश मंडळांना आवाहन
तत्पूर्वी, गणेशोत्सवानिमित्त झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी एक गाव- एक गणपती या संकल्पनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले.
 
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळानी तसेच प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, सार्वजनिक शांततेसह जिल्हा व पोलिस प्रशासनाला कायदा- सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻


‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय  

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook

Twitter | Instagram | YouTube