किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

किन्हवली: अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने पोलिस यंत्रणेवर ताण येणार आहे, पण परिसरातील हिंदू-मुस्लिम राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी म्हणून किन्हवली येथील मुस्लिम बांधवांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार ईद ए मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्याचे ठरविले आहे. याबाबत किन्हवली पोलिस ठाण्यात नुकतीच एक बैठक झाली.

यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर या दिवशी येत आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. किन्हवलीत ईद-ए-मिलाद पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी केले जातात, किन्हवलीत मिरवणूक अर्थात जुलूस काढण्यात येतो. या भव्य जुलूसमध्ये मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधवही हिंदू बांधवांना शुभेच्छा देतात. या दोन्ही सणांच्या मिरवणुका एकत्र निघाल्यास पोलिस यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये, तसेच राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी म्हणून ईद-ए-मिलादची मिरवणूक दुसऱ्या दिवशी (ता.२९) दुपारच्या नमाज पठणानंतर काढणार आहेत, असा निर्णय मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आला आहे.

किन्हवली पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, मुस्लिम समाज मुतवल्ली अजिमभाई शेख आणि सहकारी यांच्यात झालेल्या बैठकीत मुस्लिम बांधवांनी घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻


‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय  


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook

Twitter | Instagram | YouTube