भद्रकाली तलावाडी परिसरातील नटराज बंधू मित्र (भद्रकालीचा राजा) मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाचे ३१ वर्ष आहे. १९९२ ला गणेशबाबा यांच्या हस्ते स्थापन झाली.
शहरातील सगळ्यात मोठा गणपती भद्रकालीचा राजा नावाने सर्वत्र प्रचलित आहे. त्या वेळी शांताबाई कोम मुरार उडपी यांचे हॉटेल होते. त्यांच्या हॉटेलमध्ये बाप्पाची स्थापना करत गणेशोत्सव साजरा करत.
नंतर स्थानिक रहिवाशांच्या पुढाकाराने मोठ्या गणेशोत्सवात रूपांतर झाले. कालांतराने मंडळ स्थापन झाले. हिंदू- मुस्लिमबहुल भाग असल्याने दोन्ही समाजातील तरुणांकडून उत्सव साजरा करण्याची परंपरा पडली. विशेष म्हणजे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवासह येथील सय्यद शाह बाबा यांचा संदल शरीफ देखील उत्साहात साजरा केला जातो.
मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये बहुसंख्य मुस्लिम बांधव आहेत. उत्सवाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवांचे संबंध दिवसेंदिवस घट्ट झाले. सामान्य कुटुंबातील मुस्लिम तरुण अनेक वर्षापासून दैनंदिन सकाळी बाप्पाची आरती आणि स्वच्छता करत असतो. नीलेश शेलार हे मंडळाचे अध्यक्ष असून निखिल ठाकरे उपाध्यक्ष आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -