नाशिकमधील लासलगावच्या सरपंचपदी अफजल शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
 सरपंच अफजल शेख व गावकरी
सरपंच अफजल शेख व गावकरी

 

येथील ग्रामपंचायत सरपंचपदी अफजल नसीर शेख यांची निवड झाली. मंगळवारी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सर्कल भाऊसाहेब देवकाते, तलाठी नितीन केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत अफजल शेख यांना ९ मते मिळाले तर प्रतिस्पर्धी गटाचे चंद्रशेखर होळकर यांना ८ मते मिळाली.

मुदत संपल्यानंतर जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील गटाचे सरपंच होणार असल्याने निवडणूक झाली. सरपंच पदासाठी होळकर पाटील गटाचे अफजल शेख तर कल्याणराव पाटील, डिके जगताप गटाचे चंद्रशेखर होळकर यांच्यात निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी पाटील गटाचे दोन सदस्य विरोधी गटाला मिळाल्याने त्यांचे संख्याबळ नऊ झाले.

लासलगावला १९४५ ते १९४८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी चांद खां पठाण तर त्यानंतर १९५० पर्यत मोहम्मद दादामिया शेख सरपंच होते. त्यानंतर तब्बल ७४ वर्षानंतर प्रथमच मुस्लिम समाजाला अफजल शेख यांच्या रुपाने सरपंचपदाचा मान मिळाला. 

ग्रामसेवक लिंगराज जंगम, नानासाहेब पाटील, जयदत्त होळकर, सुवर्णाताई जगताप, संगीता पाटील, सायली पाटील, योगीता पाटील, अमोल थोरे, चंद्रशेखर होळकर, संतोष पलोड, रेवती होळकर, रामनाथ शेजवळ, पुष्पा अहिरे,दत्ता पाटील, अमिता ब्रम्हेचा, ज्योती निकम, अश्विनी बर्डे आदि उपस्थित होते.