रायपूर-कसाबखेडा येथे शुक्रवारपासून (ता. ३ ) मुस्लिम बांधवांचे तीनदिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमास सुरुवात झाली. या तीन दिवसांत विविध ठिकाणच्या मौलानांचे बयाण होणार आहेत दीड महिन्यापासून रायपूर व कसाबखेडा शिवारात या इज्तेमाची जय्यत तयारी सुरू होती.
मुस्लिम बांधवांना बसता यावे यासाठी भव्य असा मंडप टाकण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी पाण्याच, वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भोजन, आरोग्यसेवा देखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे. रविवारपर्यंत चालणाऱ्या या इज्तेमात मौलानांचे समाजबांधवांना मार्गदर्शन मिळणार आहे.