शबीना एम.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेल्यानंतर आज देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, मात्र आजही काही भागात महिलांना त्यांच्या हक्कासाठी, प्रतिष्ठेसाठी संघर्ष करावा लागत आहे. तरीही परिस्थितीवर मात करत सामाजिक बंधनांना झुगारून ती ठरली लक्षद्वीप बेटावरील पहिली महिला पीएचडी पदवीधारक, तेही जलचर आणि सूक्ष्मजीवशास्त्र शाखेत. या कामगिरीबद्दल त्यांचा लक्षद्वीप प्रशासनातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. शबीना एम. असे या सावित्रीच्या आधुनिक लेकीचे नाव. 'लक्षद्वीप द्वीपसमूहातील शेवाळांच्या वेगवेगळ्या प्रजातींची रचना, महत्व आणि विविधता' हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांच्या या संशोधनामुळे लक्षद्वीपमधील सागरीविश्वाची नवी बाजू जगासमोर आल्याचे प्रशासनाने सत्कारावेळी म्हटले आहे.
भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे ५०० किमी अंतरावर असलेल्या आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लक्षद्वीप बेटावरील शबीना एम, यांनी जिर आणि चिकाटीच्या जोरावर अतुलनीय कामगिरी करून दाखवली. "जलचर आणि सूक्ष्मजीवशास्त्र" विषयात उच्च शिक्षण घेऊन काय करणार आहे, असा प्रश्न अनेक जण शबीना यांना पदवीला प्रवेश घेतल्यापासून विचारत होते; परंतु आता तेब लोक शबीना यांचे कौतुक करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सत्काराला उत्तर देताना शबीना यांनी आपली शैक्षणिक वाटबाल उलगडून दाखविली. शबीना यांनी बालपणापासूनच संघर्ष पाहिला आहे. चौथ्या वर्गात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, घरातील कमावती व्यक्ती गमावल्याने पुढील शिक्षण घ्यावे की नाही, याबाबत अनिश्चितता होती, परंतु आहे त्या परिस्थितीत काटकसर करून त्यांनी लक्षद्वीपमध्येच पदवी, तसेच पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले, पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जलचर आणि सूक्ष्मजीवशास्त्र शाखेत पदव्युत्तर शाखेत प्रवेश घेतला, केवळ चार विद्यार्थ्यांच्या बॅचमध्ये शचीना या एकमेव महिला होत्या. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१४-१५ मध्ये त्या एका स्थानिक शाळेत मत्स्यशास्वाच्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.
लक्षोपमधील अत्यंत मर्यादित संधींमुळे पीएचडी करावी, असा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. एवढेच नव्हे, तर पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळेल का, याबाबत त्यांना खात्री नव्हती, परंतु शबीना यांची जलचर आणि सूक्ष्मजीवशास्त्रातील रुची लक्षात घेता लक्षद्वीपच्या विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञापीठातील मत्सजीवशास्त्रज्ञ इद्रीस बाबू के. के. यांनी त्यांना पीएचडी पूर्वपरीक्षेसाठी मार्गदर्शन केले, एवढेच नव्हे, तर बाबू यांना त्यांच्या पीएचडीसाठी मार्गदर्शन केलेले केरळ मलय आणि सागरजीवशास्त्र विद्यापीठातील प्रा. डॉ. एस. सुरेशकुमार यांनीही शवीना यांना मदत केली, २०१६ मध्ये शबीना यांनी पोएबचडीसाठी नावनोंदणी केली आणि २०१७ पासून प्रत्पक्ष संशोधनाला सुरुवात केली.
संशोधनासाठी सागरी वनस्पती, तसेच शेवाळांचे विविध नमुने संकलित करण्यासाठी शबीना यांना लक्षद्वीप द्वीपसमूहावरील विविध बेर्टावर प्रवास करावा लागला. दोन मानवरहित बेटांसह १२ बेटांवरील सागरी वनस्पती व शेवाळांच्या प्रजातीचा अभ्यास करून, त्यावर संशोधन करण्याचे काम त्यांनी केले, तसेच विद्यापीठीय संशोधनासाठी आपल्या नवजात मुलीला सोबत घेऊन त्या बोटीने कोचीला जायच्या. तिथे महिना-दोन महिने राहून एकाच वेळी शोधप्रबंधाचे काम करायच्या. दरम्यानच्या काळात पती, सासर-माहेरच्या मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळे हे काम मी पूर्णच करू शकले नसते, असे त्या प्रांजळपणे मान्य करतात. शचीना यांच्या संशोधनामुळे अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा झाला. लक्षद्वीप बेटांवर कधीकाळी असलेल्या शेवाळांच्या १८२ प्रजातींपैकी सध्या केवळ ९६ प्रजाती शिल्लक राहिल्याचे उघडकीस आले.
समुद्रामधील उत्खनन आणि कासवांचे अत्रासाठी शेवाळांवरील अवलंबित्वामुळे या प्रजाती कमी होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेष म्हणजे लक्षद्वीपच्या पाण्यात पहिल्यांदाच सात नव्या प्रजाती आढळून आल्या. माझ्या लहाणपणी मी समुद्रालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात गवत, शेवाळांचे प्रकार पाहिले होते, परंतु आता त्यापैकी अनेक प्रजाती विसतही नसल्याचे त्या सांगतात. केवळ लक्षद्वीपमधील पहिली महिला पीएचडीधारक ठरणे, हेच शबीना यांचे यश नसून, त्यांच्या संशोधनाकडे या शाखेतील माहितीचा आधारभूत स्रोत म्हणून पाहिले जाते, असे गौरवोद्वार त्यांचे मार्गदर्शक एस. सुरेशकुमार यांनी काढले.