उद्योग 'रतन' काळाच्या पडद्याआड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशाच्या उद्योगचक्राला गती देत अर्थकारणाची पायाभरणी करणाऱ्या अन् कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाचे पालन करत विविध समाजोपयोगी उपक्रमांना भक्कम बळ देणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे 'चेअरमन ऑफ एमिरेट्स, ज्येष्ठ उद्योगमहर्षी, पद्मविभूषण रतन टाटा (वय ८६) यांचे आज रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. 'टाटा सन्स'चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती दिली. रतन टाटा यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रातील महामेरू हरपला असून, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून आदरांजली वाहण्यात आली.

रतन टाटा यांना प्रकृतीच्या कारणास्तव सोमवारीच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रख्यात उद्योगप्रिय पारशी कुटुंबात १९३७ मध्ये जन्मलेल्या रतन टाटा यांनी प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूल तसेच कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि तरुण वयातच कौटुंबिक व्यवसायाची सूत्रेही हाती घेतली. त्यांच्याकडील औद्योगिक कौशल्ये आणि नेतृत्व गुणांमुळे अल्पावधीतच टाटा समूहाने विविध क्षेत्रात प्रगती साधली. त्यांची १९९१ मध्ये टाटा समूहाची कंपनी असलेल्या 'टाटा सन्स'च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नव्या व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याबरोबरच प्रतिष्ठित जग्वार-लँडरोव्हर तसेच कोरस स्टील कंपनीवर मोहोर उमटविली होती.

केवळ आर्थिक नफ्याचाच विचार न करता देशाच्या उभारणीमध्येही रतन टाटा यांनी मोलाचे योगदान दिले होते. सामाजिक कार्य आणि परोपकारी विचारांमुळे त्यांनी जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थेपैकी एक असलेल्या 'टाटा ट्रस्ट'ला वेगळी ओळख दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्यसेवा, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी काम केले जाते. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून २०१२ मध्ये पायउतार झाल्यानंतरही ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिले.
 
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली 
रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "रतन टाटा एक दूरदर्शी उद्योगपती, दयाळू आत्मा असलेले आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठेच्या व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. त्याचबरोबर त्यांनी बोर्डरूमच्या पलीकडेही योगदान दिले. आपल्या नम्रतेमुळे, दयाळूपणामुळे आणि आपल्या समाजाला चांगले बनविण्याच्या अढळ श्रद्धेमुळे त्यांनी स्वतःला अनेक लोकांशी जोडले होते."

जगभरात जापल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकिक वाढविणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी आज जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अपना मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडविणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली - शरद पवार

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्याधिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेता निर्णायक खंबीरपणा जाणि मानसिक कणखरपणा टाटा समूहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील - एकनाथ शिंदे

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटाजी यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे. श्री रतन टाटा जी एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण त्यापलीकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोत्रती आणि कुपोषण आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो - देवेंद्र फडणवीस

महान उद्योजक आणि तेवढेच थोर समाजसेवी रतन टाटा यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. उद्योजक म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीबरोबरच त्यांनी देशावरील प्रेमापोटी समाजसेवा आणि माणुसकी यांची मोठी परंपराही आपल्यामागे ठेवली आहे. त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे लक्षावधी चाहते यांच्याबरोबर माझ्या सहवेदना आहेत - अजित पवार

देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी जाजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त टाटा ग्रुपला नव्हे, तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झाला आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने भी एक वैयक्तिक मित्रदेखील गमावला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली. अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते. रतन टाटा यांच्या जाण्याने देशाने आपला एक सहृदयी पुत्र गमावला आहे - मुकेश अंबानी

रतन टाटा जाता आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारणे मला वह जात आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठी शेप घेण्याच्या तयारीत आहे आणि ही क्षमता निर्माण होण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. या टप्प्यावर त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असते. आता त्यांच्या कार्याचे अनुकरण करणे, एवढेच आपल्या हाती आहे - आनंद महिंद्रा

कोण होते रतन टाटा...

- रतन हे जमशेटजी टाटा यांचे पणतू होत. जमशेटजींनीच टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवली.
- आठवीपर्यंत मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये, त्यानंतर मुंबईतील कॅथेोइल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये आणि तेथून सिमल्यातील बिशप कॉटन
- स्कूलमध्ये ते शिक्षणासाठी गेले. दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील नवल आणि आई सोनू विभक्त झाले.
- त्यानंतर अखबों नवाबीबाई टाटा यांनी त्यांचे पालनपोषण केले. 
- शिक्षणानंतर ते १९७० मध्ये टाटा समूहात दाखल झाले, नैशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स (नेल्को) कंपनीतून कामास सुरुवात केली. 
- १९९१ मध्ये केआरडी टाटांनी आपला बारसदार म्हणून त्यांचे नाव घोषित केले.

उद्योग जगतात एन्ट्री...

- अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेऊन टाटांनी व्यवस्थापनातील मापदंडात बदल
- संशोधन, कल्पकतेला वाव आणि तरुणांना संधी देण्याचे सूत्र त्यांनी स्वीकारले. 
- सॉल्ट से सॉफ्टवेअर असा विस्तारलेल्या या समूहाने जागतिक स्तरावरील अनेक आघाडीच्या कंपन्या आपल्या समूहात सामील केल्या. - टाटा टीने टेटली, टाटा मोटर्सने जग्वार लैंड रोव्हर, टाटा स्टिलने कोरस अशा जगातल्या नामवंत कंपन्याही सामील करून घेतल्या. 
- सामान्य भारतीयांचे चारचाकीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच टाटा नॅनोचे पदार्पण वैशिष्टचपूर्ण ठरले

देशविदेशातील सन्मान...

२००० : पद्मभूषणने सम्मानित
२००८ : पद्मविभूषणने सन्मानित
२००१ : मानद डॉक्टरेट, ओहिओ विद्यापीठ
२००४ : उरंगों सरकारचे विशेष पदक
२००४ : मानद डॉक्टरेट (एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी)
२००५ : मानद डॉक्टरेट (वॉरविक विद्यापीठ)
२००६ : मानद डॉक्टरेट (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मद्रास)
२००८ : मानद डॉक्टरेट (विधी, केंब्रिज विद्यापीठ) २००८: मानद डॉक्टरेट (आयजापटी मुंबई)
२००८ : मानद डॉक्टरेट (आयआयटी खरगपूर)
२००८ : मानद नागरिकतत्व (सिंगापुर)