भारतातील कोरियोग्राफीची जननी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
सरोज खान
सरोज खान

 

भारतात ‘मदर ऑफ कोरियोग्राफी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण आज त्यांचा जन्मदिवस आहे. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २००० हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली होती. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला होता. त्यावेळी त्याचे नाव निर्मला नागपाल होते.

इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांनी स्वतःची सरोज खान म्हणून ओळख बनवली. १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात 'नजराना' चित्रपटातून बाल श्यामा आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणून वयाच्या अवघ्या  तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून सरोज आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. हावडा ब्रिजच्या 'ए मेहेरबान' या गाण्यात सरोज यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून परफॉर्म केले होते.

सरोज खान यांच्या पश्चात पती आणि तीन मुले आहेत. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी सरोज खान यांना लग्न बंधनात अडकल्या होत्या. वयाच्या १३ व्या वर्षी तब्बल २८ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या डान्स मास्टर सोहनलालशी त्यांनी लग्न केलं होते. याबाबत त्यांनी एका मूलाखतीत खूलासा केला होता की, त्यांना त्यावेळी लग्न या शब्दाचा अर्थ देखील माहित नव्हता, त्या वयात त्यांच्या गळ्यात काळा धागा बांधून त्याचे लग्न करण्यात आले.

लग्नाच्या एका वर्षातच त्यांनी एका मुलाला जन्म दिला त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र अवघ्या ८ महिन्यांतचं त्यांच्या मुलीचे निधन झाले. याच काळात सरोज यांच्या संसाराला तडा गेला होता आणि ते वेगळे झाले.  या सगळ्यामुळे त्यांना आपल्या चिमुकल्या मुलीच्या निधनाचा शोकही करता आला नाही. ८  महिन्यांच्या मुलीचा अंत्यविधी उरकल्यानंतर त्या लगेचच कामावर परतल्या. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग पुर्ण केले.

सरोज खान यांना १७ जून २०२० रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामूळे त्यांना मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र ३  जुलै २०२० रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

सरोज यांनी प्रथम श्रीदेवीसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आणि नंतर माधुरी दीक्षितचा चित्रपट केला, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

'नगीना' चित्रपटातील श्रीदेवीचे नृत्य "मैं नागिन तू सपेरा" हे त्यांचे गीत आजही लोकप्रिय आहे. त्यानंतर त्यांनी मिस्टर इंडियामध्ये श्रीदेवीसाठी "हवा हवाई" या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. हे गीत देखील आजही लोकप्रिय आहे.