फहमी बदायुनी : तरुणाईला साद घालणारा बुजुर्ग शायर

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
शायर फहमी बदायुनी
शायर फहमी बदायुनी

 

प्रज्ञा शिंदे
 
"मुझे तुमसे बिछड़ना ही पड़ेगा, 
 मैं तुमको याद आना चाहता हूं|"

प्रत्येकाच्या स्मरणात आपली शायरी कोरून प्रसिद्ध शायर फहमी बदायुनी यांनी वयाच्या 72 व्या वर्षी बदायूं येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. सोमवारी ईदगाह रोडवर नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. यावेळी अनेक शायर-कवी उपस्थित होते. 

यावेळी,
"कितना महफूज हूं कोने में, कोई अड़चन नहीं है रोने में"
म्हणणाऱ्या या शायरला अनेकांनी भरल्या डोळ्यांनी शेवटचा निरोप दिला. 

कोण होते शायर फहमी बदायुनी?
"आज पैबंद की जरूरत है, ये सजा है रफू न करने की...। 
मुझे तुमसे बिछड़ना ही पड़ेगा, मैं तुमको याद आना चाहता हूं..।"

यांसारख्या शेरांनी अनेकांच्या डायरीची पाने सजली असतील. हे शेर आहेत पुत्तन खान उर्फ ​​फहमी बदायुनी यांचे. त्यांनी आपल्या शायरीने जणू प्रत्येकाच्या भावना शब्दबद्ध केल्या.प्रत्येकाच्या हृदयाला हात घालणाऱ्या त्यांच्या शायरीमुळे तरुणाई या वृद्ध शायराकडे आकर्षित झाली होती. आपल्या शायरीने त्यांनी देश-विदेशातील मुशायरे गाजवले आणि जगभरातील रसिकांवर गारुड केले.   

 
फहमी बदायुनी यांचा जन्म ४ जानेवारी १९५२ रोजी उत्तरप्रदेशमधील बदायुन येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव जमान शेर खान उर्फ ​​पुत्तन खान होते. अनेक उर्दू शायरांप्रमाणे त्यांनी आपल्या नावात गावाचे नावही लावले आणि ते बदायुनी झाले. बदायुनला नवी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.. 

सुरुवातीच्या काळात त्यांनी अकाउंटंट म्हणून काम केले. मात्र काही दिवसांनी त्यांनी ही नोकरी सोडली. पुढे त्यांनी मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ते विज्ञान आणि गणितात निष्णात होते.  शिवाय त्यांना उर्दू साहित्य आणि शायरीतही विशेष रस होता. त्यामुळे ते शायरी करू लागले. ८० च्या दशकात त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. बदायुन आणि आजूबाजूच्या परिसरातील मुशायऱ्यांमध्ये ते भाग घेऊ लागले.

एका मुशायऱ्यात,
“प्यासे बच्चे पूछ रहे हैं, मछली-मछली कितना पानी, 
छत का हाल बता देता है, पतनालों से बहता पानी।” 

हा शेर त्यांनी सादर केला आणि तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांची शायरी म्हणजे सामान्य जीवनातील सामान्य समस्या होत्या, पण व्यक्त करण्याची शैली अशी होती की, दु:खाचा विचार करतानाही विचार करणाऱ्याला हसू फुटेल. अशा आयुष्याबद्दल बोलणे, जीवनावर प्रेम करणे, ही फहमी  बदायुनी यांचीच कारागिरी होती. त्यांनी आयुष्याला शायरीतून व्यक्त केलं होत. 

 
फहमी बदायुनी देशभरात मुशायरे सादर करू लागले. त्यांचे अनेक शेर एकामागून एक प्रसिद्ध झाले. २५०हुन अधिक मुशायऱ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. इंटरनेट युगात तर त्यांची शायरी आणखीच पॉप्युलर झाली. इंस्टाग्रामवर  लाखोंच्या घरात असलेले त्यांचे चाहते याचीच साक्ष देतात. 'शेरी मजमूए, पांचवी सम्त आणि दस्तकें निगाहों की' हे तीन शायरी  संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. 

वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बदायूं येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी-उर्दू साहित्याची मोठी हानी झाली. या धक्क्यातून त्यांचे जगभरातील चाहते अद्याप सावरलेले नाहीत. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत आहे. पुण्यातील प्रखर गर्ग या तरुण कवीने फहमींचे दुसरे पुस्तक 'दस्तकें निगाहों की' प्रकाशित करण्यात सिंहाचा वाटा उचलला. 

आपल्या आवडत्या शायराविषयी आठवण सांगताना तो म्हणतो, "फ़हमी साहब की शायरी वो शय है, जो सुनी कम और दिखाई ज़्यादा देती है, ख़्वाब बनकर, आँखों के अंदर, जैसे हर एक शेर वो लम्हा था जिसमें सदियाँ जी गई. हर सुनने वाले की अपनी अलग दुनिया के अलग ख़्वाब बुने हैं फ़हमी साहबने."

शेवटी हताशपणे तो म्हणाला, "एक वही शख़्स रहे जिनसे मिला सिर्फ़ कुछ ही दफ़ा, और ज़िंदगी भर का रिश्ता क़ायम रहा. ज़िंदगी में बड़े लंबे अरसे से एक ‘उस्ताद’ की कमी महसूस कर रहा हूँ, और उनके जाने से ऐसा लग रहा है जैसे अब उम्मीद करना भी फ़िज़ूल है." 

फहमी यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा संदर्भ देताना सुप्रसिद्ध कवी फरहत एहसास म्हणतात,
“उनसे पहली मुलाक़ात से पहले तक मैं उनके नाम से वाक़िफ़ नहीं था. ये एक अजीब सूरत-ए-हाल थी कि उनके शेर सुनने के बाद एक तरफ़ तो मैं उनसे नावाक़िफ़ होने पर शर्मिंदा हो रहा था, तो दूसरी तरफ़ उर्दू और दीगर ज़बानों की अदबी सूरत-ए-हाल पर अच्छी ख़ासी नज़र होने का मेरा गुमान शिकस्त के सदमे से दो-चार था.”

 
फहमी बदायुनीच्या बद्दल प्रसिद्ध कवी चराग शर्मा म्हणतात, 
“सोशल मीडिया ने जो नुक़सानात किए सो किए, लेकिन फिर भी मैं इसका एक बड़ा एहसान मानता हूं कि उसने दुनिया से फ़हमी बदायूनी का तआरुफ़ कराया. फ़हमी साहब ने शेर के वज़्न की क़ीमत समझी और ये बताया कि शायरी अपनी हैसियत से भी मशहूर हो सकती है, और इसके लिए हंगामा बरपाने की कोई ख़ास ज़रूरत नहीं. मैंने उनके लिए एक शेर कहा था जो मैंने उन्हें सुनाया भी था…
 
पढ़ता नहीं है कोई अभी ग़ौर से मुझे 
भेजा गया है पहले मेरे दौर से मुझे.”

फहमी बदायुनींचे शेर..
प्रत्येक कवी आणि शायरकडे एक अशी विशिष्ट नजर असते जी सामान्य गोष्टीमधील असामान्यपणा सौंदर्याने अलंकृत करत असते. फहमी बदायुनीही असेच होते....

त्यांचा मनाला साद घालणारा एक असाच शेर....
"मर गया हमको डांटनेवाला
अब शरारत में जी नहीं लगता…"

त्यांच्या शायरीच्या माध्यमातून त्यांनी वरवर दिसणाऱ्या जगाच्या आतील जग पाहण्याचं कसब सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. फहमी बदायुनीच्या शायरीतील विचारांची सूक्ष्मता अनेकदा आश्चर्यचकित करते. शब्दांना योग्य पद्धतीने हाताळण्याचा कसब त्यांच्याकडे आहे. त्यांच्या शायरीमध्ये एकही शब्दाची अदलाबदल करावी असा कुठेही वाव नाही. सामान्य शब्द, सामान्य रचना आणि सामान्यांच्या भावना अतिशय कल्पकतेने आणि सौंदर्यपूर्ण रीतीने त्यांनी शायरीमध्ये गुंफल्या आहेत.

शेवटचे काही क्षण …
"हमारा हाल तुम भी पूछते हो, 
तुम्हें मालूम होना चाहिए था| "

जगाचा निरोप घेण्यापूर्वी फहमी बदायुनी यांनी त्यांच्या अनेक डायऱ्या त्यांच्या शिष्यांना सुपूर्द केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या अनेक गझलांचा समावेश आहे, ज्या आजवर छापल्या जाऊ शकल्या नाहीत. 72 वर्षीय फहमी यांना 'तरुण कवी' म्हणणाऱ्या त्यांच्या चाहत्यांपर्यंत हा खजिना लवकरच पोहोचेल, अशी आशा आहे.

 
याविषयी त्यांचे शिष्य विनीत आशना म्हणतात, 
“हमारी हिम्मत न हुई वो डायरियां क़ुबूल करने की. हमें ये लगा कि अगर हमने ऐसा किया तो वो फ़ारिग़ हो जाएंगे. हमने कहा कि अभी इसमें तो बहुत पन्ने ख़ाली हैं. इन पन्नों को भरना है आपको. उन्होंने पलट कर कोई जवाब नहीं दिया. वो मन बना चुके थे जाने का.”

बदायुनीच्या शेवटच्या दिवसांचा उल्लेख करून त्यांचे शिष्य चराग शर्मा म्हणतात,
“मुझे और विनीत जी को ऐसा लगा मानो वो इसी मौक़े का इंतज़ार कर रहे थे. ऐसा लगा मानो हमें देख लेने के बाद उन्होंने ये फ़ैसला किया कि अब जाना है. इस दिन से बहुत पहले ही उनका दुनिया से जी उचट गया था. वो जीना ही नहीं चाहते थे. ये हमें बहुत पहले मालूम पड़ चुका था. कुछ महीनों का वक़्त तो ऐसा था कि अगर कभी किसी अजीब वक़्त पर किसी दोस्त का फ़ोन आता तो ज़हन में अंदेशा उठता था कि कोई बुरी ख़बर आ रही हो.”

 
फहमी बदायुनी यांच काही प्रसिद्ध शेर: 

"प्यासे बच्चे खेल रहे हैं
मछली मछली कितना पानी"

"ताने बैठा हूंँ आईने पे तीर
मैं निशाना भी हूंँ, शिकारी भी"

"उसने ख़त का जवाब भेजा है
चार लेकिन हैं एक हांँ के साथ"

"ख़ुशी से कांप रही थीं ये उंगलियां इतनी
'डिलीट' हो गया इक शख़्स 'सेव' करने में"

"न जाने और कितने दिन तक अपने घर का दरवाज़ा 
हमीं बाहर से खोलेंगे, हमीं अंदर से खोलेंगे"

"मैंने उस की तरफ़ से ख़त लिक्खा
और अपने पते पे भेज दिया"

"तुम भी कितनी मदद करोगे मीर
उसकी आंखों पे शेर कहना है"

"मैंने गिनती सिखाई थी जिसको
वो  पहाड़ा   पढ़ा  रहा  है  मुझे"

"टहलते फिर रहे हैं सारे घर में 
तेरी ख़ाली जगह को भर रहे हैं"

"हम तिरे ग़म के पास बैठे थे
 दूसरे ग़म उदास बैठे थे"

फहमी बदायुनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...
 
-प्रज्ञा शिंदे

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter