पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठे बदल घडवत आहे. केंद्र सरकार सक्रियपणे एआय इकोसिस्टम तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे संगणकीय शक्ती, जीपीयू आणि संशोधनाच्या संधी योग्य किमतीत उपलब्ध होणार आहेत.
एआय सर्वांसाठी उपलब्ध
AI केवळ काही मोठ्या कंपन्यां आणि निवडक लोकांसाठीच मर्यादित होते. केंद्र सरकारच्या विविध .उपक्रमांमुळे आता विद्यार्थ्यांना, स्टार्टअप्सना उच्च दर्जाच्या एआय सुविधांचा लाभ मिळत आहे. 'इंडियाएआय मिशन' आणि 'एआय उत्कृष्टता केंद्रे' यांसारख्या उपक्रमांमुळे भारताच्या एआय क्षेत्राला नवीन दिशा मिळत आहे. यामुळे नवोन्मेष (काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रक्रिया) आणि आत्मनिर्भरतेला चालना मिळत आहे.
२०४७ मध्ये भारत एआय पॉवरहाऊस?
भारत २०४७ मध्ये विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. यामध्ये एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारत एआयमध्ये जागतिक नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
एआय संगणक आणि सेमीकंडक्टर सुविधा
भारत आपल्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एआय संगणक आणि सेमीकंडक्टर सुविधा निर्माण करत आहे. २०२४ मध्ये सुरु झालेल्या 'इंडियाएआय मिशन' अंतर्गत सरकारने पाच वर्षांत १०,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या मिशनमध्ये १८,६९३ जीपीयू (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स) असलेल्या अत्याधुनिक संगणक सुविधांचा समावेश होईल. याचा उपयोग भारतीय भाषांसाठी एआय सोल्यूशन्स तयार करण्यासाठी केला जाईल.
डेटा आणि उत्कृष्टता केंद्रे
डेटा एआयच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने 'इंडियाएआय डेटा सेट' प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. यामुळे भारतीय संशोधक आणि स्टार्टअप्सना उच्च-गुणवत्तेचे डेटा सेट सहज मिळू शकतील. यामुळे कृषी, आरोग्य, शाश्वत शहरांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या अचूकतेला आणि नवोन्मेषाला चालना मिळेल. याचबरोबर दिल्लीमध्ये तीन 'एआय उत्कृष्टता केंद्रे' स्थापन करण्यात आली आहेत.
स्वदेशी एआय मॉडेल्स आणि भाषा तंत्रज्ञान
भारत स्वदेशी एआय मॉडेल्स विकसित करीत आहे. यामध्ये भारतीय भाषांमध्ये खास कार्य करणारे मोठे भाषा मॉडेल्स (LLMs) तयार केले जात आहेत. 'भारतजन' या प्रकल्पाद्वारे, एआयच्या मदतीने भारतीय भाषांमध्ये सार्वजनिक सेवा वाढवली जाईल.
डिजिटल पब्लिक पायाभूत सुविधा आणि एआय एकत्रीकरण
भारताची डिजिटल पब्लिक पायाभूत सुविधा (DPI) आता एआयच्या मदतीने सुधारणे जात आहे. यामध्ये UPI, Aadhaar, DigiLocker यांसारख्या पायाभूत सुविधांचा वापर करून आर्थिक आणि प्रशासनिक सेवांमध्ये एआय प्रणाली लागू केली जात आहे. महाकुंभ २०२५ मध्ये एआयच्या मदतीने गर्दीचे व्यवस्थापन करण्यात आले होते.
भारताच्या एआयच्या क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण दिले जात आहे. सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) अनेक सुधारणा केल्या आहेत. यामुळे विद्यार्थी एआय, 5G आणि सेमीकंडक्टर डिझाइनचे तंत्रज्ञान शिकू शकतील. भारताने एआय कौशल्यांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रमुख स्थान मिळवले आहे.
एआय उद्योगातील वाढ
भारताच्या एआय उद्योगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. भारतीय कंपन्या एआयला धोरणात्मक प्राधान्य देत आहेत आणि स्टार्टअप्सला अधिक निधी मिळत आहे. भारत एआय क्षेत्रात जागतिक नेता बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल उचलत आहे.
भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगती, सरकारच्या धोरणात्मक पुढाकारामुळे, देशाला एक जागतिक एआय नेता बनवण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा, स्वदेशी मॉडेल्स आणि शस्त्रागार तयार करीत आहे. डेटा ऍक्सेस, परवडणारी संगणक सुविधा, आणि एआयवर आधारित समाधान भारतीय लोकांसाठी फायदेशीर ठरतील. यामुळे भारत आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करेल आणि जागतिक एआय लँडस्केपमध्ये नेतृत्व करण्याचे प्रयत्न करेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter