कुवेत हा महत्त्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण आखाती देश आणि भारत यांच्यातली जिवलग दोस्ती नवा इतिहास घडवत आहे. अरब देशांशी भारताचे मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यामुळे भारत-पश्चिम आशिया-युरोप यांना सांधणाऱ्या आर्थिक मार्गिकेची शक्यता बळावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४च्या डिसेंबरमध्ये कुवेत नावाच्या पश्चिम आशियाई देशाचा दोन दिवसांचा प्रवास करून भारतात परतले. सन १९८१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी कुवेत येथील प्रवास करून परतल्या होत्या. म्हणजे भारताच्या पंतप्रधानांनी त्रेचाळीस वर्षे उलटल्यावर कुवेतची यात्रा केली आहे.
ऑगस्ट १९९० मध्ये इराकच्या कर्णधाराने सद्दाम हुसेन याने कुबेतवर आक्रमण केले. भारत व इराकचे हे कर्णधार यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यामुळे आपण तेव्हा सद्दाम हुसेनचा निषेधही केला नव्हता. कुवेतसारख्या देशाला हे खटकले असणार, यात शंका नाही. परिणामतः कुवेत व भारत यांच्यात काही दुरावा निर्माण झाला होता. शिवाय, त्या काळात कोणत्याही अरब देशाशी संबंध वाढविताना आपण पाकिस्तानच्या भावभावनांची कदा करीत होतो.
गेल्या ४३ वर्षांत सर्वच नद्यांतून बरेच पाणी वाहून गेले आहे. सीरियाचे प्रमुख बशर अल असद यांना दीर्घकाळ चाललेल्या उठावानंतर सत्ता सोडावी लागली. आता ते रशियात निघून गेले आहेत कुवेतच्या विरोधातत्त्या सद्दाम हुसेनलाही लोक विसरून गेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुवेत बीता 'गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल'चा अध्यक्ष म्हणून कार्यरत झाला आहे. या पृष्ठभूमाचा लाभ उठविण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी कुवेतचा प्रवास करणे इष्ट होते. या कौन्सिलमधे संयुक्त अरब आमिराती बहारिन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवत या देशांचा समावेश होतो. नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षात कुवेत वगळता इतर सर्व सदस्य देशांचा प्रवास कला आहे; पण वर नमूद केल्याप्रमाणे कुवेतचा प्रवास मात्र टाळला होता.
वस्तुतः आखाती देशांमधे निवास करणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या ८० लाख आहे. पैकी कुवेतमधे पाच लाख भारतीय नागरिक राहात आहेत. कुवेतला भेट देऊन या पाच लाख भारतीयांनाही दिलासा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पूर्णत्वास नेले आहे.
कुवेतशी भारताचे संबंध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकीदीपासून आहेत. सन १९६१मध्ये कुवेत मुक्त झाला. तत्पूर्वी कुवेत भारताचा रुपयाच कुवेत चलन म्हणून वापरत होता. आणि कैक कुवेती नागरिकांनी मुंबईत घरे खरेदली होती. तेव्हापासून आजपर्यंत कुवेतकडून आपण खनिज तेल आयात करीत आहोत. कुवेत भारताला खनिज तेल पुरविणाऱ्या देशांमधे सहाव्या क्रमांकावर आहे व या छोट्या देशाचा भारताशी होणारा व्यापार दहा अब्ज डॉलर इतक्या किमतीचा आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुवेत काय वा इतर कोणताही अरब देश काय, वर्तमानात पाकिस्तानपेक्षा भारताशीच अधिक जिव्हाळ्याचे संबंध वाढविण्यास उत्सुक आहेत! सारांश, भारतात राहाणाऱ्या मुस्लिम नागरिकांना मोदी यांच्या कारकीदाँत दुय्यम दर्जाचे स्थान मिळत नसून सर्वाथनि न्यायाची व माणुसकीची कदर केली जाते आणि सन १९४७ पासून खरा सेक्युलरिजम भारतात जोपासला गेला आहे ही अरब देशांची खात्री झालेली दिसते. म्हणून तर कुवेतचे अमीर शेख मेशल अल्लू अहमद अत् सबाह यांनी नरेंद्र मोदींना कुवेतच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवले आहे. विशेष म्हणजे भारताशी त्या देशाने 'सामरिक सहभागीते 'चा समझोताही केला आहे.
भारतानेही इस्राईलला पॅलेस्टाइनच्या सार्वभौमत्वावर शिक्कामोर्तब करावे आणि शांतता प्रस्थापित करण्यात पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब आमिराती या देशांनी इस्लामिक चालीरीतीमधे सुधारणा करण्यात उत्साह दर्शविला आहे. तर कतारने ज्या आठ भारतीय नागरिकांपैकी सात जणांना मृत्युदंडापासून सूट दिली आहे, त्याच कतारला आपले परराष्ट्रमंत्री एस्, जयशंकर यांनी नुकतीच भेट दिली असून या भेटीमुळे आठच्या भारतीय नागरिकालाही मृत्यूदंडापासून मुक्त केले जाईल, ही आशा उत्पन्न झाली आहे. म्हणजे 'गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल'च्या सर्व सदस्य देशांमधे भारताविषयी चांगली जवळीक निर्माण झालेली दिसत आहे. तेव्हा या कौन्सिलच्या अध्यक्ष असलेल्या कुवेतशी मैत्रीचे संबंध वाढविण्यास अतिशय अनुकूल वेळ आलेली असतानाच आपण कुवेतबरोबर सामरिक संबंध वाढविण्याचा मुहूर्त साधला आहे.
भविष्यात कुवेतबरोबर संरक्षणविषयक संबंध वृद्धिंगत होणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान, शेती तसेच संस्कृती वगैरे क्षेत्रांमधेही भारत आणि कुवेत या दोघांमधे वेगवेगळ्या प्रकारची दोस्ती रूजणार असे संकेत मिळाले आहेत. नरेंद्र मोदींना आतापर्यंत सौदी अरेबिया, अफगाणिस्तान वगैरे देशांनी सर्वोच्च सन्मान दिले आहेतच. आता कुवेतनेही असा सन्मान देऊन बिल क्लिंटन, जॉर्ज बुश वगैरेच्या यादीत भर घातली आहे. मग मोदीनी जिथे ९० टक्के भारतीय निवास करीत आहेत, त्या श्रमिक बस्तीला भेट देऊन भारताच्या तिजोरीत मोलाची भर टाकणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींची आस्थेने विचारपूस केली.
अरब देशांशी भारताचे मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यामुळे भारत पश्चिम आशिया युरोप यांना सांधणाऱ्या आर्थिक मार्गिकची शक्यता बळाचली आहे. तसेच अमेरिका, संयुक्त अरब आमिराती आणि इस्राईल तसेच भारत यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध अधिक सुदृढ होणार, अशी सुचिन्हे दिसत आहेत.
'गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल मध्ये सहा राष्ट्रांचा सहभाग आहे. या सर्व राष्ट्रांशी भारताचा एकूण व्यापार २०२३-२४ या वर्षात १६२ अब्ज डॉलरचा होता. याबाबतीत युरोपीय समुदायालाहों गल्फ कौन्सिलने मागे टाकले आहे. या आखाती देशांनाही चाचेगिरी, दहशतवाद आदी प्रश्नांनी पिडलेले असून त्यामुळे भारताशी असलेल्या त्यांच्या सहकार्याला हेदेखील परिमाण आहे. कुवेतसारख्या आखाती देशांनी भारताप्रमाणेच बहिसंलग्नतेचे धोरण स्वीकारले आहे. हे आखाती देशही 'ब्रिक्स'शी संलग्न झाले आहेत. एकूणच आखाती देशांमध्ये भारताला मिळत असलेले स्थान ही महत्त्वाची घटना ठरते.
कुवेत हा महत्त्वाचा, वैशिष्टयपूर्ण आखाती देश आणि भारत यांच्यातली जिवलग दोस्ती नवा इतिहास घडवत आहे, यात शंका नाही.
- प्रा. अशोक मोडक