ऑगस्टमध्ये UPI ने केला सर्वोच्च विक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताने ऑगस्टमध्ये प्रथमच १ हजार कोटी UPI व्यवहारांचा टप्पा पार करून एक नवीन विक्रम केला आहे. हे व्यवहार १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे आहेत. गेल्या सात वर्षांतील भारताच्या डिजिटल प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे.

३० ऑगस्टपर्यंत, १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात UPI द्वारे महिन्याभरात एकूण १ हजार कोटी व्यवहार डिजिटल पद्धतीने केले गेले, ज्यांचे मूल्य १५ लाख कोटी पेक्षा जास्त आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने दिली आहे.

३५ हून अधिक देशांना आता भारताचे UPI तंत्रज्ञान स्वीकारायचे आहे जेणेकरून ते परदेशात भारतीय लोकांना वापरता येतील. ज्या देशांनी अलीकडेच यूपीआयचा अवलंब करण्यास स्वारस्य दाखवले आहे त्यात जपानचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की तज्ञांचा असा विश्वास आहे की या दराने भारतातील डिजिटल वॉलेट व्यवहार लवकरच रोख व्यवहारांना मागे टाकू शकतात. २०१६-१७ मध्ये नोटाबंदीमुळे, लोकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट स्वीकारले आणि रोख पैसे वापरण्याची सवय बंद केली.

QR कोडने महत्त्वपूर्ण योगदान दिले
QR सुरू झाल्यानंतर, UPI व्यवहार आणखी वेगाने वाढले आहेत. एका अहवालानुसार, UPI चे ३३० लाखाहून अधिक युनिक यूजर्स आहेत आणि सुमारे ७० लाख दुकानदारांनी ३५६ लाख QR कोड स्वीकारले आहेत. याशिवाय PhonePe, Google Pay, Paytm, Cred आणि Amazon Pay सारख्या UPI ॲप्समुळे व्यवहार वाढले आहेत.

अनेक देशांनी भारताचे UPI स्वीकाराले आहे. आपल्या देशात मोठ्या व्यापाऱ्यांपासून भाजीपाला विकणाऱ्या छोट्या-मध्यम दुकानदारांपर्यंत सगळेच UPI द्वारे व्यवहार करत असल्याने इतर देशांचा त्यात रस वाढला आहे. जपानसह ३५ हून अधिक देशांना आता भारताचे UPI तंत्रज्ञान स्वीकारायचे आहे.