युवकांनी करावे देशाचे नेतृत्व - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी त्यांचेच तैलचित्र देऊन सत्कार करण्यात आला.
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी त्यांचेच तैलचित्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

"विकसित भारत मोहिमेचे नेतृत्व युवकांनी स्वतःकडे घेण्याची आवश्यक असल्याचे सांगतानाच 'चलता है, चलने दो...' वृत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विकसित भारत युवा नेतृत्व संबाद कार्यक्रमात बोलताना केले. देशभरातून आलेल्या तीन हजार युवकांशी यावेळी मोदी यांनी संवाद साधला.

"कोणत्याही देशाला विकसित व्हायचे असेल तर त्यासाठी मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ती गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सध्याचा भारत हा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नरत असलेला देश आहे. चलता है, चलने दोन... अशा प्रवृत्तीचे लोकदेखील

समाजात आहेत. अशा लोकांना बदल होणे अनावश्यक वाटत असते. अशा प्रवृत्तीचे लोक प्रेतांपेक्षा श्रेष्ठ मानता येणार नाहीत. आपले जीवन चालवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ध्येय. आणि आजचा भारत ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालला आहे," असे मोदी म्हणाले.

प्रत्येकाचा सहभाग हवा
ध्येयाची निश्चिती करून ते गाठण्यासाठी वाटचाल करणे, हे केवळ सरकारी यंत्रणांचे काम नाही. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सामील होणे आवश्यक आहे. लाखो लोकांनी यात सामील झाले पाहिजे. विकसित भारत हा केवळ माझा नाही, तर तो तुमच्या सर्वांचा असला पाहिजे, असे मोदी यांनी नमूद केले. पुढील दहा वर्षांत साध्य करायच्या गोष्टींचा ऊहापोह त्यांनी केला.

५०० गिगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, वर्ष २०३५ पर्यंत ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. अंतराळात भारताच्या स्थानकाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. साऱ्या जगाने चांद्रयान मोहिमेचे यश पाहिले आहे. आता गगनयान मोहिमेसाठी आपणास सज्ज झालो आहोत.

"अर्थव्यवस्था विकसित झाली तर त्याचे सकारात्मक परिणाम समाजाच्या सर्व स्तरावर दिसून येतात, हेही लक्षात घेण्याची गरज आहे," असे मोदी म्हणाले.