अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशातील अब्जाधीशांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून, १३ नव्या अब्जाधीशांसह २८४ संख्येच्या आधारावर भारताने जगात तिसरा क्रमांक मिळवला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. वाढत्या कर्जामुळे मागच्या वर्षपिक्षा यावेळी मुकेश अंबानी यांची संपत्ती एक लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याने, ते जगातील पहिल्या दहा सर्वांत श्रीमंताच्या यादीतून मात्र बाहेर पडले आहेत. 

हुरुन प्लोवल रिच लिस्ट २०२५' ही माहिती देण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून टेस्लाचे सीईओ एलॉन मल्क यांचे स्थान अढळ आहे. मस्क यांची संपत्ती तब्बल ८२ टक्क्यांनी वाढलो असून, त्यांची एकूण संपत्ती ४२० अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. 

या यादीनुसार, मुकेश अंबानी ८.६ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले असून, त्यांनी गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. अदानी यांची संपत्ती १३ टक्क्यांनी वाहून ८.४ लाख कोटी रुपये झाली असून, ते भारतीय अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. 

भारतीय अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ९८ लाख कोटी रुपये असून, ती भारताच्या 'जीडीपी'च्या सुमारे एक तृतीयांश आहे आणि सौदी अरेबियाच्या संपूर्ण जीडीपी'पेक्षा जास्त आहे. या २८ व्यक्तापको १७५ जणांची संपत्ती बादली आहे, तर १०९ जणांची संपत्ती स्थिर राहिलों आहे. पुण्यातील सायास पुनविला २ लाख कोटी रुपयांच्या सात्तीसह देशातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.