संसदेत सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक २०२४ वरील संयुक्त समितीचा अहवाल आज (दि.३) लोकसभेत सादर केला जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल आणि सदस्य संजय जयसवाल हे अहवाल सादर करणार आहेत.

भाजप सदस्यांच्या सूचनांचा समावेश 
यापूर्वी समितीने गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना अहवाल सादर केला होता. समितीने बुधवारी बहुमताने आपला अहवाल मंजूर केला, ज्यात भाजप सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

विरोधी सदस्यांनी अहवालावर असहमती दर्शवली 
दुसरीकडे, विरोधी खासदारांनी हा अहवाल असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. त्यांचा आरोप आहे की, हा निर्णय वक्फ बोर्डांना नष्ट करेल. भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाला १५ विरुद्ध ११ मतांनी मंजुरी देण्यात आली. तर विरोधी सदस्यांनी अहवालावर असहमती नोंदवली आहे.

वक्फ बोर्डांच्या कार्यात हस्तक्षेप 
भाजप सदस्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेत सादर करण्यात आलेले विधेयक वक्फ संपत्तींच्या व्यवस्थापनात आधुनिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विरोधकांनी याला मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांवर हल्ला आणि वक्फ बोर्डांच्या कार्यात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर विचार करणाऱ्या संसदाच्या संयुक्त समितीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी गुरुवारी बिर्लांशी संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन अहवाल सादर केला. अहवाल सादर करताना समितीचे इतर सदस्य निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, संजय जयसवाल आणि इतर सदस्य उपस्थित होते.

बुधवारी पॅनेलने बहुमताने आपला अहवाल सादर केला. त्या अहवालात सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी सुचवलेल्या बदलांचा समावेश होता. त्यानंतर विरोधकांनी या प्रयत्नाला वक्फ बोर्डांना नष्ट करण्याचा एक प्रयत्न असल्याचे बोलले आहे.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर संसदाच्या संयुक्त समितीने मसुदा कायद्यावर अहवाल १५-११ बहुमताने स्वीकारला होता. जगदंबिका पाल यांनी सांगितले की, गेल्या पाच महिन्यांतील विविध बैठका घेतल्या असून, देशभरातील शेकडो प्रतिनिधींच्या संघटनांशी त्यांनी चर्चा केली आहे.